अहमदनगर – दि.२० फेब्रुवारी
अहमदनगर शहरात अहमदनगर लोकशाही बचाव मंचच्या वतीने निर्भय बनो सभा आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सर्जेराव निमसे होते ते प्रमुख वक्ते निखिल वागळे हे होते.सुरवातीला प्रास्ताविक किरण काळे यांनी केले तर सर्जेराव निमसे यांनी बोलताना देशातील परस्थिती किती विदारक होत चालली आहे याचे विश्लेषण केले.
प्रमुख वक्ते निखिल वागळे यांनी देशातील राज्यातील परस्थितीवर चौफेर हल्ला केला.देश हुकूमशाही कडे चालला आहे यावेळी त्यांनी पुतीन यांचे उदाहरण दिले राज्यात गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मुळे गुंडगिरी वाढत चालली आहे.गुंडांना आपल्या पक्षात घेऊन राज्य चालवले जात आहे.पक्ष चोरण्याचा कार्यक्रम सुरू आहे.देशातील हिटलर शाही विरुद्ध आपलयाला लढायला आपण उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ते मुळे मस्तवालपणा आला आहे शहरातील गुंडगिरी विरुद्ध उभे रहा माफियांच्या विरोधात उभे रहा हिटलरचा विजय होत नाही विजय गांधींचा होतो त्यामुळे हिंसा न करता एक जुटीने गुंडांच्या विरोधात उभे राहिले तर इतिहास घडतो असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.
देशात अराजकता वाढत चालली आहे त्याबाबत सत्ताधारी कोणीच काही बोलायला तयार नाहीत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोलण्यासाठी आपणच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे वृत्तवाहिन्याही विकल्या गेल्या आहेत असं खळबळजनक विधान त्यांनी यावेळी बोलताना केल आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला किरण काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सर या कार्यक्रमा आधी पोलिसांनी त्यांना दिलेल्या नोटीसीची यावेळी किरण काळे यांनी चांगलीच चिरफाड केली.
या निर्बंध कार्यक्रमास रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती सभागृहाच्या बाहेरही निखिल वागळे यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.