HomeUncategorizedमराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी २६ फेब्रुवारीपासून सुरू.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त...

मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी २६ फेब्रुवारीपासून सुरू.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले समाधान तर मनोज जरांगे पाटील अजूनही ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम..

advertisement

अहमदनगर दि.२७ फेब्रुवारी
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असेलल्या मराठा आरक्षण मुद्द्यावर मोठी माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षण कायदा राज्यात लागू झाल्याचे समोर आले आहे. विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या मराठा आरक्षण विधेयकावर कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव (विधी) सतीश वाघोले यांनी यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्याने हा कायदा लागू
झाल्याचं स्पष्ट झालं आहे. SEBC या गटामध्ये
आरक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सचिव सतीश वाघोले यांनी मराठा आरक्षण विधेय
स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारने राजपत्र जाहीर |
सचिव सतीश वाघोले यांनी मराठा आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केलेआहे. यानंतर आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यकअसलेली वैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामध्ये सांगण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याबाबत माहिती दिली असून अनेक वर्षांपासूनचे मराठा समाजाची मागणी आमच्या सरकारने पूर्ण केली असल्याचे आम्हाला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर हे आरक्षण न्यायालयात टिकणार का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे यामध्ये अनेक त्रुटी आहेत आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे अशी मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular