Homeशहरकाकासाहेब उर्फ चंद्रकांत शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबिर संपन्न

काकासाहेब उर्फ चंद्रकांत शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोग निदान शिबिर संपन्न

advertisement

अहमदनगर दि.२६ नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील सावडी उपनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते सुर्या फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत उर्फ काका शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हडको येथील गणेश मंदिर सभागृहात अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान शहराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा शुभारंभ लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा सचिव प्रसाद मांढरे, खजिनदार संदिप सिंग चव्हाण माजी नगरसेविका वीणाताई बोज्जा माजी नगरसेविका कलावती शेळके,रविंद शितोळे,डॉ. भुषण अनुभुले, उपाध्यक्ष भुषण चंगेडे, खजिनदार डॉ. विलास बी. सोनवणे, सचिव डॉ. डी. एस. पवार, सहसचिव लक्ष्मीनिवास सारडा, संचालक बोरा आर. एस.,अभय मुथ्था, शिवाजी रणसिंग, डॉ. समीर होळकर, राजेंद्र मेहेत्रे, डॉ. ऋतुजा चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पवार व आर एम ओ. डॉ. माधुरी मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते झाला.

 

या शिबीरामध्ये त्वचा विकार, इसब नावाट, पिंपल्स, सोरायसिस, चाई लागणे, खरुज, पांढरे डागा, मस, चामखीळ,कुरुप, केसांच्या समस्या, केस गळणे, केसात कोंडा होणे, केस दुभंगमे, मुळव्याध, भंगदर, फिशर, पित्त, पित्ताशयाचे खडे, मुतखडा, प्रोस्टेड ग्रंथीची वाढ, बद्धकोष्ठता, अल्सरेटिव्ह कोलायटीस, मधुमेह, स्त्रियांच्या मासिक पाळीचे विविध विकार, मेनोपॉज, अंगावरुन पांढरे जामे, वंध्यत्व, लठ्ठपमा, पी सी ओ डी. गाऊट, मणक्यांचे विकार, संधीवात, दमा, अॅलर्जी, नेहमी होणारी सर्द, कान फुटमे, टॉन्सीलायटीस, मनोविकार या सारख्या विविध आजारांवर तज्ञ होमिओपॅथीक डॉक्टरांनी तपासणी करून मार्गदर्शन केले.

35 वर्षा पासून लायन्स क्लबच्या माध्यमातून सेवा सुरू आहे आरोग्य नाही तर अनेक सामाजिक कार्यात सहभागी असतो आज काकासाहेब शेळके यांनी सेवेची संधीविधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मात्र वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम सर्व ठेवतात मात्र सामाजिक भान ठेऊन रुग्णांची सेवा करणे एक मोठी जबाबदारी आहे ते काकासाहेब शेळके यांनी पार पडली आणि सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करून खूप मोठी सेवा केली आहे असं यावेळी बोलताना लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी बोलताना सांगितलं.

यावेळी बोलताना काकासाहेब शेळके यांनी सांगितले की दरवर्षी वाढदिवस साजरा होत असतो मात्र वाढदिवस साजरा होत असताना तो वाढदिवस आपल्यासह समाजातील सर्वच घटकांना यादगार झाला पाहिजे त्यासाठी धांगडधिंगा न करता आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून विविध आरोग्य शिबीर आम्ही दरवर्षी भरवत असतो या आरोग्य शिबिरांना या परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद ही लाभत असतो आणि डॉक्टरांचा मोठे सहकार्य लाभत असल्याने असे उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असल्याचे काकासाहेब शेळके यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

शिबीरात आज आलेल्या रुग्णांची पुढील तपासणी अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल सावेडी रोड येथे करण्यात येणार असल्याचे काकासाहेब शेळके यांनी यावेळी सांगितले

या सर्व रोग निदान आरोग्य शिवराज सिव्हिल आडको परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती तसेच सायंकाळी प्रेमराज सारडा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजन काकासाहेब शेळके यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular