.अहमदनगर दि.२९ जुलै
अहमदनगर शहरात पुन्हा एकदा मयूर सोमवंशी या तरुणावर वार झाले आहेत ही घटना पाईप लाईन रोड भागात घडली असून मयूर याच्या दोन्ही हातावर वार झाले आहेत.
नगर शहरात गेल्या काही दिवसापासून खुनाच्या आणि हाणामारीच्या घटना घडत असून घटनांचा तपास लागत नाही तोच पुन्हा नवीन घटना घडण्याचे सत्र सुरूच आहे पाईप लाईन भागात ही घटना घडली असून या तरुणावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना समजताच आमदार संग्राम जगताप यांनी हॉस्पिटलमध्ये जावून जखमीची विचारपूस केली हॉस्पिटलमध्ये मयूर यांच्या मित्रांनी गर्दी केली असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत मात्र ही मारामारी आणि वाद कशामुळे झाले अद्याप समजले नाही