Home राज्य त्या दोघांनी दिल्या पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा…

त्या दोघांनी दिल्या पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा…

सिंधुदुर्ग दिनांक 24 फेब्रुवारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल धक्कादायक प्रकार समोर आला असून. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये दोघांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना भारत विरोधी घोषणा दिल्या. यामुळे मालवण येथील संतप्त नागरिकांनी घोषणा देणाऱ्या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आज या निषेधार्थ मालवणमध्ये संतप्त नागरिकांनी बाईक रॅलीसुद्धा काढली होती.

काल चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत , पाकिस्तानचा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला गेला. दरम्यान हा सामना सुरु असताना मालवणमध्ये दोघा जणांनी भारताच्या विरोधात घोषणाबाजी केल्या. तेथे उपस्थित नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतरही काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिल्या. ज्यावेळेस रोहित शर्मा बाद झाला, तेव्हा या समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केली. यावरुन मालवणमध्ये आज संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणाच्या विरोधात सर्वपक्षीय बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीच्या वेळी पोलिसांना निवेदनही देण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version