Homeजिल्हाऔरंगजेबाचे भूत उतरता उतरेना... वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे आज पारनेर बंदची हाक

औरंगजेबाचे भूत उतरता उतरेना… वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे आज पारनेर बंदची हाक

advertisement

अहमदनगर दि. १३ जून

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या भूताने थैमान घातले आहे. अहमदनगर शहरात एका संदल उरूस कार्यक्रमात औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचे प्रकार नगर जिल्ह्यात वाढत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून शेवगाव,पाथर्डी तालुक्यातील जवखेडे कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवल्यामुळे आणि इंस्टग्रमवर व्हिडिओ टाकल्या मुळे अनेक तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र याचं लोन आता पारनेर मध्ये आले असून पारनेर तालुक्यातील पाबळ या गावात एका तरुणाने औंरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले होते. या तरुणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी मागावी लागली.

या घटनेच्या निषेधार्थ आज पारनेर तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता राखावी असे आवाहन पारनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular