अहमदनगर दि.११ जून
अहमदनगर जिल्ह्यात गाजलेल्या दुरगाव येथील अत्याचार प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. राजू शेख व अजीज शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या दोघांनी सात एप्रिल रोजी कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील एका मोलमुजिरी करणाऱ्या मुलीच्या घरात प्रवेश करून मुलीचे दोन्ही हात पाय बांधून बळजबरीने अत्याचार केला होता व ही घटना कोणाला सांगितल्यास आई व भावाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात राजू शेख व अजिज शेख यांच्या विरोधात376,376( ड)452,506 नुसार दाखल करण्यात आले होते. .
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांचा शोध सुरू केला असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दोन्ही आरोपी दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्या नुसार पोलीस पथकाने शेतमजूर म्हणून देशांतर करून दोन दिवस पळत ठेऊन राजू शेख व अजिज शेख या दोघांनाही ताब्यात घेतले आहे या दोघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तुषार धाकराव पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन मखरे सुनील चव्हाण, अतुल लोटके, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, भीमराज खडसे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे ,जालिंदर माने, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड आणि उमाकांत गावडे आदींनी केली आहे.