Home शहर अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील महापालिकेचे गाळे पाडण्याचा मार्ग मोकळा. गाळे धारकांच्या...

अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील महापालिकेचे गाळे पाडण्याचा मार्ग मोकळा. गाळे धारकांच्या ३५ याचिका कोर्टाने फेटाळल्या.

अहमदनगर दि.१५ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील सावडी उपनगरांमधील प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये महानगरपालिकेच्या मालकीचे भव्य दिव्य असे व्यापारी संकुल आहे मात्र हे व्यापारी संकुल आता पडण्याच्या परिस्थितीत आले असून या ठिकाणी अनेक मूळ गाळधारकांनी गाळे विकले असून या ठिकाणी भाडेकरू आणि पोट भाडेकरू सध्या व्यवसाय करत आहेत.

या ठिकाणचं जुने झालेले व्यापारी संकुल पाडून या ठिकाणी नवीन असे चार-पाच मजली भव्य दिव्य असे व्यापारी संकुल उभारण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे जेणेकरून महानगरपालिकेला या ठिकाणावरून मोठे भरगोस उत्पन्न मिळू शकेल मात्र जुने व्यापारी संकुल पाडण्यास त्यासाठी गाळे पाडण्यास गाळे धारकांनी विरोध केला होता.

 

भाडेकरू, पोटभाडेकरू यांनी महानगरपालिके विरोधात अहमदनगर जिल्हा न्यायालयात व्यापारी संकुल पाडू नये म्हणून याचिका दाखल केल्या होत्या याची सुनावणी अनेक दिवसांपासून सुरू होते या सोनवणे दरम्यान आज अहमदनगर जिल्हा न्यायालयाने महानगरपालिका विरोधात दाखल केलेल्या ३५ याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. ८ प्रकरणी सुनावणी सुरू आहे, मात्र यासाठी कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे योग्य तो निर्णय घेण्यास महापालिकेला मोकळीक आहे, अशी माहिती महापालिकेचे वकील ऍड. प्रसन्ना जोशी (Adv Prasannakumar Joshi) यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता मध्यंतरी दोन वेळा या ठिकाणी गाळेधारकांना समजून काही तत्कालीन नगरसेवकांनी या ठिकाणी गाळे पाडण्याचा प्रयत्न केला होता.मात्र त्यालाही मोठा विरोध झाल्याने अखेर तो प्रयत्न अयशस्वी झाला. काही वेळा राजकीय हस्तक्षेप आणि काही वेळा व्यापाऱ्यांनी केलेला विरोध यामुळे अनेक दिवसांपासून हा प्रकल्प रेंगाळत चालला होता. या

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version