Home शहर उड्डाणपूलाच्या खाली असलेल्या पीलरवर जाहिरात चिकटवून विद्रुपीकरण भोवले गुन्हा दाखल होण्याची शक्यता

उड्डाणपूलाच्या खाली असलेल्या पीलरवर जाहिरात चिकटवून विद्रुपीकरण भोवले गुन्हा दाखल होण्याची शक्यता

अहमदनगर दि.१५ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील पूर्णत्वास आलेल्या उड्डाणपूलाच्या खाली असलेल्या पिलरवर शहराच्या सौंदर्यतरणात भर पडेल म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित काही घटनांचे चित्र रेखाटण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून होत आहे.उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या अनेक पिलरवर सध्या या चित्रांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

मात्र या सुशोभीकरणावर एका शिक्षण संस्थेने जाहिरात चेक ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला या ठिकाणी फिलरवर सौंदर्यकरण करण्याचा हेतूच असा होता की या ठिकाणी इतर जाहिराती लागून पीलरचे विद्रुपीकरण होऊ नये. मात्र त्याला तिलांजली देत एका खाजगी संस्थेने आपल्या संस्थेची जाहिरात या ठिकाणी लावली होती. याबाबत खासदार सुजय विखे पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी या जाहिरात लावणाऱ्या संस्थेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उड्डाणपुलाच्या संबंधित संस्थेला दिले होते.

या पिलर वर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रीकरण करण्याआधी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन शहराच्या सौंदर्यकरणात भर पडेल असा उपक्रम राबवत असताना या ठिकाणी कोणीही जाहिरात फलक लावू नये असेही सांगितले होते. मात्र नगर शहरातील त्या संस्थेला त्याचा विसर पडल्यामुळे त्या संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राखाली आपल्या संस्थेची जाहिरात चिटकवली होती. त्यामुळे आता हे विद्रुपीकरण चांगलेच भोवणार असून याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version