दिल्ली-९ मे
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच दहा मे रोजी लागण्याची शक्यता असून त्याबाबतचे संकेत आज दिल्लीमधून मिळाले आहेत त्यामुळे संपूर्ण राज्यासह दिल्लीतील भाजपा सरकारचेही याकडे लक्ष लागून आहे.
सोळा आमदारांच्या अपात्रतेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होऊ शकते आजच्या सूनवणी दरम्यान सर न्यायाधीशांकडून तसे संकेत देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार राहुल शेवाळे हे तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
सर न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल कधी लागेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते या निकालामुळे महाराष्ट्रातील शिंदे फडवणीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे..
आजच्या मिळालेल्या संकेता नंतर उद्धव ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे अनेक मोठे नेते दिल्लीकडे रवाना झाले आहेत आणि दोन्ही बाजूंनी निकाल आमच्या बाजूने लागेल हे ठामपणे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता काही तासानंतरच हा निकाल नेमका काय लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.