Home क्राईम भूखंड बळकावणारी टोळी सक्रिय.. नगरकरांनो सावधान

भूखंड बळकावणारी टोळी सक्रिय.. नगरकरांनो सावधान

अहिल्यानगर दिनांक 13 जुलै –
बाहेरगावी राहणा-या जमीन मालकाच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची परस्पर विक्री करणारी एक टोळी नगर मध्ये सक्रिय असून “बिल्डर” या टोपणनाव असलेला एकजण या टोळीचा म्होरक्या आहे.हा कागदावर कधीच कुठे दिसत नाही. मात्र आपल्या शार्प डोक्याने बनावट कागदपत्रे मात्र हुबेहूब तयार करून देतो.नगर, पुणे, नेवासा या ठिकाणी त्याचे वास्तव्य असते.

Oplus_131072

विशेष म्हणजे ही टोळी एखादा प्लॉट घेताना मोठा प्लॉट असेल तर त्यापैकी मालकाला जेव्हढा प्लॉट विकायचा असेल त्याची सुरवातीला काही ठराविक रक्कम देऊन साठेखत करून घेतले जाते आणि जेव्हा खरेदीची वेळ येते त्यावेळी जागा काही ठराविक मापाची असते त्यापेक्षा दुप्पट म्हणजे पूर्ण जागेची खरेदीचे कागदपत्र जोडून साह्य घेतल्या जातात. जेव्हा त्या प्लॉट वर मूळ मालकाचे नाव कमी होऊन नवीन मालकाचे नाव लागते तेव्हा त्याला सर्व प्रकार समजतो मात्र त्याच्या साह्य असल्याने तो हतबल होतो. प्लॉट विक्री करतो एक गुंठ्याची आणि खरेदी देतो पाच गुंठ्याची ही खासियत या टोळीची आहे.

टोळी अशाच भूखंडांचा शोध घेत दिवसभर शहरात फिरते. अनुकूल बनावट कागदपत्रे तयार करून भूखंड विक्री करते. या मध्ये नगर शहरात त्याला मदत करणारा छोटा चेतन असून तो असे प्लॉट शोधून काढून बनावट कागदपत्रे सादर करत प्लॉट विक्री अथवा स्वतः खरेदी करण्याचे नाटक करतात. बनावट कागदपत्रांच्या आधारे मूळ मालकाला ब्लॅकमेल करून त्यांच्यापासून पैसे उकळण्याचा फंडा या टोळीचा असून अनेक ठिकाणी असे खोटे कागदपत्र तयार करून लेटिकेशन दाखवत ते प्लॉट स्वस्तात विकत घेऊन दुप्पट भावाने विक्री केली जातात अथवा जो मालक या टोळीला प्लॉट विकत नाही तो प्लॉट बाजारामध्ये लेटिकेशन असल्याची अफवा जाणीवपूर्वक उठवली जाते. तो प्लॉट विक्री होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात.

एका दिवसात बनावट कागदपत्रे – मुद्रांक कार्यालय आणि नगर भूमापन कार्यालयात अशी बोगस कामे करणारे रॅकेट आहे. हे रॅकेट एकाच दिवसात बनावट कागदपत्रे तयार करते. भूखंडाचा मूळ मालक असतानाही मला कागदपत्रांसाठी एक वर्ष पाठपुरावा करावा लागतो मात्र अशा पण त्वरित कागदपत्रे उपलब्ध होतात हेही एक विशेष म्हणावे लागेल.

या भूखंड लुटणाऱ्या माफी यांचा उद्योग असा चालतो

या टोळ्या जमिनीच्या मालकाच्या नावावर, बनावट कागदपत्रे तयार करून, जमिनीची विक्री करतात किंवा त्यावर ताबा मिळवतात.

या टोळ्यांमध्ये अनेकदा स्थानिक व्यक्ती, सरकारी अधिकारी, आणि इतर व्यावसायिक सामील असतात.

बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी बळकावण्याचे प्रकारः

बनावट खरेदी-विक्री करारः जमिनीच्या मालकाच्या संमतीशिवाय, बनावट खरेदी-विक्री करार तयार करून, जमिनीची विक्री केली जाते.

बनावट सात-बारा उताराः जमिनीच्या मालकीचे बनावट सात-बारा उतारे तयार करून, जमिनीवर ताबा मिळवला जातो.

बनावट एन.ए. परवानगीः जमिनीच्या वापरासाठी बनावट एन.ए. परवानगी (Non-Agricultural Permission) तयार करून, जमिनीवर बांधकाम केले जाते.

बनावट सरकारी कागदपत्रेः बनावट सरकारी कागदपत्रे (उदा. अधिकार, बांधकाम परवानगी) तयार करून, जमिनीवर ताबा मिळवला जातो.

बनावट पॉवर ऑफ अटॉर्नीः मृत व्यक्तीच्या नावे बनावट पॉवर ऑफ अटॉर्नी (Power of Attorney) तयार करून, जमिनीची विक्री केली जाते.

या टोळ्या कशा काम करतात? 1. माहिती गोळा करणेः टोळीतील सदस्य, जमिनीची माहिती गोळा करतात, जसे की जमिनीचा मालक, जमिनीची किंमत

2. बनावट कागदपत्रे तयार करणेः

बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी, टोळीतील सदस्य, विविध शासकीय कार्यालयांमधून माहिती मिळवतात किंवा बनावट कागदपत्रे तयार करतात.

3. फसवणूक करणेः
टोळीतील सदस्य, जमिनीच्या मालकाला किंवा खरेदीदाराला, बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवतात.

4. जमिनीवर ताबा मिळवणेः बनावट कागदपत्रांच्या आधारे, टोळीतील सदस्य जमिनीवर ताबा मिळवतात किंवा जमिनीची विक्री करतात.

कायदेशीर मदतः जमिनीच्या मालकाने, बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक झाल्यास, त्वरित कायदेशीर मदत घ्यावी. पोलिसात तक्रार दाखल करणेः

जमिनीची कागदपत्रे तपासाः जमीन खरेदी करताना, जमिनीची कागदपत्रे (सात-बारा उतारा, खरेदी-विक्री करार, इत्यादी) तपासावी.

सरकारी कार्यालयांमध्ये माहिती तपासाः जमिनीच्या संदर्भात, सरकारी कार्यालयांमध्ये माहिती तपासावी.

जमिनीची मालकी तपासाः जमिनीची मालकी, अधिकृत नोंदींमध्ये तपासावी.

जमिनीच्या संदर्भात कोणताही संशय असल्यास, त्वरित वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version