Home शहर महसूल विभागाचे भंगार खेळाच्या मैदानावर… खेळाडूंना खेळासाठी मैदान नाही … आमदार संग्राम...

महसूल विभागाचे भंगार खेळाच्या मैदानावर… खेळाडूंना खेळासाठी मैदान नाही … आमदार संग्राम जगताप यांनी येऊन केली मैदानाची पाहाणी.. मैदान लवकर मोकळे करा अन्यथा तहसील कार्यालयात खेळाडूंसह करणार आंदोलन..नगरसेवक अजिंक्य बोरकर

अहमदनगर दि. २१ ऑक्टोबर

अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर मधील गंगा उद्यान मागील क्रीडांगणावर महसूल विभागाच्या विभागाने काही दिवसांपूर्वी जप्त केलेल्या ट्रक, जेसीबी, पोकलॅण्ड आणि डंपर अशा गाड्या खेळाच्या मैदानावर आणून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून या ठिकाणी खेळणारे फुटबॉल खेळाडू दुसऱ्या मैदानावर खेळायला जात आहेत या अडचणीमुळे अनेक खेळ बंद झाले आहेत.

हे सर्व जप्त केलेले वाहने आकाशवाणी केंद्र समोरील तहसील कार्यालयाच्या मागील आवारात ठेवण्यात आले होते. मात्र या ठिकाणी आता भव्य असे महसूल भवन उभे केले जाणार असल्याने या ठिकाणी काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी ही सर्व वाहने या खेळाच्या मैदानावर तात्पुरती आणून लावण्यात आली होती मात्र गेले दहा दिवस उलटूनही या मैदानावरून हे वाहने हलत नसल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांचा खेळ थांबला आहे.

ही गोष्ट अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांना समजताच त्यांनी या मैदानावर घेऊन पाहणी करून ही वाहने तात्काळ हटवावेत याबाबत तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी येत्या काही दिवसात कुस्ती चाचणी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे त्यामुळे या ठिकाणी मंडप टाकण्यासाठी अडचणी येत असल्याने आणि खेळाडूंचा खेळ थांबल्यामुळे ही वाहने लवकरात लवकर हटवावेत अन्यथा तहसील कार्यालयात खेळाडूंसह आंदोलन केले जाईल असा इशाराही माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी दिलाय.

नगर शहर परिसरामध्ये अनेक भागात विविध सरकारी कार्यालयाचे मोकळे भूखंड पडून आहेत मात्र अशा मोकळ्या आणि बिन कामाच्या भूखंडावर वाहने न लावता खेळाच्या मैदानावर आणून वाहने लावल्याने खेळाडूंमधून संताप व्यक्त केला जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version