अहिल्यानगर दिनांक 27 जानेवारी
अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या ड्रग्स प्रकरणामुळे पोलीस दलाची मान खाली गेली आहे. हे प्रकरण सुरू असतानाच आता पुन्हा एकदा नवीन प्रकरण समोर आले असून जिल्हा पोलिस दलातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा एक जवळचा आस्थापना वरील एका कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आला असून एका पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्याने त्या बाबत लेखी अर्ज नगरच्या भिंगार पोलिस ठाण्यात दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

महिला स्वतः तिच्या पतीसह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती अशी खात्रीलायक माहिती हाती आली असून मात्र तिचा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः आपल्या हातात घेऊन तिला उद्या सकाळी दहा वाजता पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलवले असल्याची ही माहिती समोर आली आहे. मात्र हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पोलीस दलाला पुन्हा एखादा धक्का बसू शकतो.
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळचा कर्मचारी महिलेबाबत चुकीचे कृत्य करत असल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे रक्षक भक्षक म बनत आहे का असा असा सवाल उपस्थित होतोय. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सुरक्षित नसतील तर इतर महिलांचे काय? त्यामुळे आता सर्वच काही संशयाच्या भवऱ्यात सापडले आहे.ते कर्मचारी पोलीस असून सध्या स्टेनो चे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.