Home राज्य पोलिसांच्या पगाराबाबत मोठी बातमी

पोलिसांच्या पगाराबाबत मोठी बातमी

मुंबई दि.३ मे
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या माध्यमातून प्रवासासाठी पोलीस विभागाकडून विशेष सोय करण्यात आली होती. पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून महिना अखेरीस 2700 रुपये प्रत्येकी तर पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्यातून 5400 रुपये प्रत्येकी असे पैसे वजा करत सार्वजनिक वाहतुकीसाठी देय केले जायचे.

यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांना सुविधेमुळे सार्वजनिक शासकीय गाड्यांमधून तिकीट न काढता निशुल्क प्रवास करता येत होता. मात्र यामुळे जे कर्मचारी आणि अधिकारी बेस्ट किंवा परिवहन विभागाच्या बसने प्रवास करत नव्हते त्यांच्याही खात्यातून हे पैसे वजा होत असल्याने त्याचा फटका पोलिसांना बसत होता.

आता वित्त विभागाने मोठा निर्णय घेत हा निशुल्क प्रवास बंद केला आहे. ज्या पोलिसांना बसेस किंवा बेस्टचा वापर करायचा आहे. त्यांनी तिकीट काढून प्रवास करावा असा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या नावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून 2700 रुपये आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्यातून जे 5400 रुपये कापले जात होते ते आता कापले जाणार नाहीत. त्यामुळे पोलिसांना हा दिलासा मिळालेला आहे..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version