HomeUncategorizedकोविड सेंटरचे गौडबंगाल कोविड सेंटर बाबत महापालिका प्रशासन पोलिसांना माहिती देईना पोलिसांचे...

कोविड सेंटरचे गौडबंगाल कोविड सेंटर बाबत महापालिका प्रशासन पोलिसांना माहिती देईना पोलिसांचे पुन्हा महानगरपालिकेला स्मरणपत्र

advertisement

अहमदनगर दि.25 नोव्हेंबर

अहमदनगर महानगरपालिकेचे वैदयकीय अधिकाऱ्यासह शहरातील कोवीड उपचार केंद्र चालविण्यांवर कारवाई करावी अशी तक्रार संदीप अशोक भांबरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती. आतापासून कोतवाली पोलीस ठाण्याकडे आला असून कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्याकडे हा तपास आहे.

तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी महानगरपालिकेकडे १४ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून सन २०२० मध्ये कोवीड- १९ या साथीच्या प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनीक आरोग्य विभागाने कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोवीड सेंटर,डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल असे वर्गीकरण करुन महानगर पालीका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त यांना साथ व रोग नियंत्रणाचा सक्षम अधिकारी नेमण्यात आले होते. व त्यांनाच वर नमुद कोविड सेन्टर याना परवाणगी देण्याचे अधिकर दिलेले होते. महानगरपालिकेकडून कोणत्या हॉस्पिटल व डॉक्टरांना आणि कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याची संपूर्ण यादी तसेच परवानगी प्रत कोरोना काळात कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्या रुग्णालयांना आणि डॉक्टरांना परवानगी देण्याचे अधिकार कोणाला देण्यात आले होते त्याच्या आदेशाची प्रत, महाराष्ट्र शासनाने वर्गीकरण केलेल्या कोविड सेंटरला परवानगी देत असताना कोणकोणत्या पथक अधिकारी व त्यांनी कोणते निकष पाहणी करून त्यांना परवानगी देण्यात आली त्याचे पाहणी अहवाल प्रत ,कोविड काळात कोविड केअर सेंटर अथवा हॉस्पिटल सुरू करण्यात येण्यासाठी राज्यशासनाचे व केंद्रशासनाचे काय व कोणते निदेष देण्यात आले आहेत त्या आदेशाची प्रत मिळावी अशी मागणी पोलिसांनी महानगरपालिकेकडे केली होती

तसेच कोविड हॉस्पीटल सुरु करण्याबाबत वैदयकीय अरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांना परवाणगी देण्याचा अधिकार देण्यात आला होता का त्या आदेशाची प्रत,कोविड हॉस्पीटल मध्ये औषधोउपचारा
दरम्यान मयत झालेल्या रुग्णांची नावे, पत्ता याची यादी देण्यात यावी. अशा विविध प्रकारची माहिती पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेकडे पत्र देऊन मागितली होती मात्र आता या पत्राला 10 दिवस उलटूनही महानगरपालिकेने अद्याप माहिती दिली असल्याने पोलिसांनी पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनाला स्मरण पत्र पाठवून माहिती देण्याबाबत कळवले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular