Home क्राईम तोफखाना पोलिसांच्या हद्दीत सावेडी परिसरातील पाच कॅफे हाऊस वर अश्लील चाळे करताना...

तोफखाना पोलिसांच्या हद्दीत सावेडी परिसरातील पाच कॅफे हाऊस वर अश्लील चाळे करताना जोडप्यांना पकडले.. स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई मात्र तोफखाना पोलिसांना हे दिसलेच नव्हते..

अहमदनगर दि. ८ जानेवारी

अहमदनगर शहरात विविध कॅफे हाउस(cafe house)या गोंडस नावाखाली अश्लील चाळे होत असल्याबाबत “आवाज महाराष्ट्राचा” या वेब पोर्टलवरून सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या कॅफे कल्चर मुळे तरुण पिढीसह शालेय विद्यार्थी सुद्धा या कॅफे कल्चरचे बळी पडू लागले आहेत. कॅफे हाऊस मध्ये नुसते अश्लील चाळे नाही तर त्याच बरोबर विविध नशा सुद्धा विकत मिळत असल्याने आजकालची तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थी यामध्ये बळी जात असून पालकांसमोर हतबल होण्याशिवाय पर्याय नसल्याचे काही पालकांनी बोलूनही दाखवले आहे. मुलगा व्यसनाच्या आहारी गेला आणि पैशासाठी काहीही वाटेल ते करण्याचं काम करू लागल्यामुळे अनेक पालक आता चिंताग्रस्त झालेले आहेत. “आवाज महाराष्ट्राचा” या पोर्टलवरून कॅफे हाऊस, हुक्का पार्लर याबाबत अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत.कॅफे हाऊस मध्ये नेमकं काय चालतं याची वस्तूस्थिती सुद्धा अनेक वेळा मांडली आहे. मात्र फक्त काही ठराविक काला नंतर या कॅफेवर छापा पडतो आणि तात्पुरती कारवाई करून पुन्हा त्या मालकांना सोडले जाते. मात्र वास्तविक पाहता या कॅफे हाऊस उध्वस्त करणे गरजेचे आहे. अंतर्गत बदल आणि छोटे रूम्स (room ) तोडून टाकण्यात आल्या पाहिजेत नाहीत तर पुन्हा काही तासानंतर त्या कॅफे हाऊस मध्ये तेच खेळ सुरू होतात.कॅफे हाऊस मुळे आपली पिढी बरबाद होते याबाबत प्रत्येकाने जागृत होणे गरजेचे आहे तरच ही कॅफे हाऊस संस्कृती कायमस्वरूपी बंद होऊ शकते.

अहमदनगर शहरातील तोफखाना (tofkhana police)हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या (lockal crime branch )पोलिसांनी पाच कॅफे हाऊसवर छापे टाकले आहेत. या ठिकाणी अश्लील चाळे करताना काही जोडप्यांना पकडले आहे. तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमधील झेड के कॉफी हाऊस,झेड बॉलीवूड कॅफे, बाबज कॅफे,अर्षदा कॅफे , आशा कॅफे मध्ये तरुण तरुणी अश्लील चाळे करताना पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी या कॅफे हाऊसच्या मालकांसह आणि चालकांसह अश्लील चाळे करणाऱ्या तरुण- तरुणींसह पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी चक्क बनावट नातेवाईक तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आले होते. म्हणजेच आजची पिढी किती निर्ढावलेली आहे याची प्रचिती या प्रकरणावरून दिसून येतेय.वाम मार्गाला जाणारी पिढी वाचवायची असेल तर प्रत्येक पालकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपला मुलगा अथवा मुलगी दिवसभर नेमके कुठे जाते, कोणाबरोबर राहते यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तरुण-तरुणींच्या एका चुकीच्या पावल्यामुळे अख्खा कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version