Homeक्राईमसाहेब आता पोलीस ठाण्याच्या आतच मटका टपरी लावायची राहिली...नगर मध्ये थेट पोलीस...

साहेब आता पोलीस ठाण्याच्या आतच मटका टपरी लावायची राहिली…नगर मध्ये थेट पोलीस ठाण्याच्या समोरच मटका टपरी लावून अवैद्य धंदेवाल्यांने दिले पोलिसांना आव्हान !

advertisement

अहमदनगर दिनांक 2 फेब्रुवारी

अहमदनगर शहरातील एका पोलीस ठाण्याच्या आवाराच्या भिंतीच्या लगतच मटका टपरी सुरू असून यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध धंदे कितीही बंद केले तरी ते सुरूच राहतात काही ठराविक वेळेतच पोलीस अवैद्य धंद्यांवर कारवाई करतात मात्र पुढे या केसेसचे काय होते हे कोणालाही अध्यापही कळालेले नाही तक्रार आली तर त्या ठिकाणी छापा पडतो मात्र काही काळानंतर पुन्हा ते अवैध धंदे तसेच सुरू राहतात त्यामुळे तक्रार करणारेही कंटाळून जातात ही वस्तुस्थिती आहे.

अहमदनगर शहरात पोलिसांचा धाक कमी होतोय का? असाच काहीसा सवाल आता या प्रकरणावरून समोर येऊ लागला आहे. अवैध धंदे हे चोरीछुपे सुरू असतात मात्र थेट पोलीस स्टेशनच्या आवाराच्या भिंतीलागतच मटका टपरी लाऊन सर्रास या ठिकाणी हा अवैध मटका व्यवसाय सुरू आहे. मात्र पोलिसांना आपल्या भिंतीलागतच्या टपरीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही का ? यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये वेगळाच संदेश जाण्याची शक्यता आहे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर हा प्रश्नचिन्ह असून अवैद्य धंदेवाल्यांना आता कशाचीच भीती उरली नाही का असेही वाटू लागले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या आवारातील संरक्षण भिंतीला खेटूनच मटक्याची टपरी खुलेआम सुरू आहे.मात्र पोलिसांना ही गोष्ट माहीत नसेल का ? असा प्रश्न उपस्थित राहण्याबरोबरच जर माहित असेल तर मग या अवैध धंद्याला परवानगी कोणी दिली ? असे असेल तर संपूर्ण शहरातही ठिकठिकाणी अवैध धंदे सुरू करण्यास हरकत नाही अशी मीश्किल चर्चाही आता सुरू आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैद्य धंदे चोरीछुपे सुरू आहेत. मात्र थेट पोलीस ठाण्याच्या संरक्षण भिंतीच्या आड हा धंदा सुरू असल्यामुळे आता अवैद्य धंदेवाल्यांना पोलिसांची भीतीच उरली नाही असे या प्रकरणावरून दिसतेय.त्यामुळे साहेब आता फक्त पोलीस स्टेशनच्या आत मध्ये असे धंदे सुरू करायला परवानगी द्यायला हरकत नाही असेच म्हणावे लागेल.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular