Homeक्राईमभिंगारदिवे मळ्यात तोफखाना पोलिसांनी पकडला 34 किलो गांजा

भिंगारदिवे मळ्यात तोफखाना पोलिसांनी पकडला 34 किलो गांजा

advertisement

अहमदनगर दिनांक 2 फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील भिंगारदिवे मळ्यात गांजा विक्री करणाऱ्या मदन सदाफुले याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. मदन सदाफुले याच्याकडून पोलिसांनी 34 किलो गांजा जप्त केला आहे.

पो कॉ सुमीत गवळी याने दिलेल्या फिर्यादी वरुन तोफख्राना पोस्टे गु र नं – 122/2024 NDPS कायदा कलम 8 (क), 20 ( ब ) ii (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.निरी. सचिन रणशेवरे हे करत आहेत.

तुफान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भिंगारदिवे मळ्याजवळील मातोश्री हॉटेल समोर अमोल मदन सदाफुले हा गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री नितीन रणदिवे, पो.उप.निरी श्री सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाट, पोहेकॉ भानुदास खेडकर, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ सुधिर खाडे, पोहेकॉ अहमद इनामादार, पोना. संदिप धामणे, पोना. वसीम पठाण, पोकॉ सुमीत गवळी,पोकॉ सतीष त्रिभुवन, पोकॉ सतीष भवर, पो.कॉ दत्तात्रय कोतकर, पो.कॉ शिरीष तरटे, पोकॉ बाळासाहेब भापसे, यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार एका घरामध्ये जाऊन छापा टाकला असता त्या घरामध्ये प्रत्येकी दोन किलो वजनाचे पाकिट असे एकुण 17 पाकिट34 किलो गांजा चारचाकी कार, डिजीटल वजनकाटा, व दोन बॅग असे एकुण 12,63,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला पापर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे डीवायएसपी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे

.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular