HomeUncategorizedजनतेच्या पैशातून उधळपट्टी नको कामे दर्जेदार करा.. माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर... लाल...

जनतेच्या पैशातून उधळपट्टी नको कामे दर्जेदार करा.. माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर… लाल टाकी ते दिल्लीगेट परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू..

advertisement

अहमदनगर दि.४ फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील ठिकठिकाणी पडलेल्या खड्डे बुजवण्याचे (पॅचींग) काम सध्या अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. सावेडी उपनगर आणि शहराला जोडणारा मुख्य रस्ता असलेल्या लाल टाकी ते दिल्लीगेट पर्यंतच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत हे खड्डे बुजवण्याचे काम सध्या महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. मात्र खड्डे साफ न करता वरच्या वर खड्डे बुजवण्याचे काम करून डांबरीकरण केले जात असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन खड्डे जेसीबीने साफ करून खोल करून त्यामध्ये खडी डांबर टाकून व्यवस्थित बुजवण्याच्या सूचना दिल्यानंतर जेसीबीच्या साह्याने खड्डे साफ करून आतील माती उकरून त्यामध्ये खडी आणि डांबर टाकून ते व्यवस्थित बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

खड्डे बुजवण्याचे काम महानगरपालिका हे जनतेच्या कर रूपी पैशातून करत असते त्यामुळे या पैशाचा अपव्याय न होता खड्डे व्यवस्थित बुजने गरजेचे आहे. आणि वरचेवर खड्डे बुजवले तर हे खड्डे पुन्हा होण्याची शक्यता असल्याने माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी तातडीने धाव घेऊन व्यवस्थित खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular