HomeUncategorizedनगर मधील एक बडा राजकीय नेता कुतूहला पोटी तो फसला आणि नको...

नगर मधील एक बडा राजकीय नेता कुतूहला पोटी तो फसला आणि नको ते करून बसला… सोशल मीडियावर वावरताना जरा सावधान…छोटीशी गंमत येईल अंगलट

advertisement

अहमदनगर दि.१९ डिसेंबर

जेव्हापासून अँड्रॉइड मोबाईल माणसाच्या हातात आला आहे तेव्हापासून माणसाचं खाजगी आयुष्य संपून गेला आहे तर या मोबाईलमुळे अनेकांचे खाजगी आयुष्य उध्वस्त झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मोबाईल मुळे माणूस माणसात राहिला नाही चार माणसे एकत्र आले तरी प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसतो त्यामुळे चार जण एकत्र येऊनही ते तिथे नसलेल्या माणसाबरोबर संपर्कात असतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माणसा माणसांमधील दुरावा अधिकच होत चालला आहे.

सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म जेवढा चांगला तेवढा वाईटही आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपण जगाच्या जवळ जात असताना यापासून अनेक मोठे धोकेही आता जाणवू लागले आहेत. अनेकांचे आयुष्य उध्वस्त करणारा हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आता हळूहळू घातक ठरू लागला आहे.

अलीकडच्या काळात फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप याच्या माध्यमातून फेक अकाउंट वरून मुलींचे आणि महिलांचे मेसेज येतात सुरुवातीला हाय, हॅलो इथून सुरुवात होऊन नंतर हे संभाषण वाढत गेल्यानंतर समोरचा माणूस आपल्या आवाक्यात आला आहे हे समजतात व्हिडिओ कॉल केला जातो आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर समोरच्या माणसाकडून आक्षेपार्ह कृत्य करून घेतले जतो आणि त्या माणसालाही कळत नाही की आपण जे करतोय त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग समोरचा माणूस करत असतो काही वेळानंतर त्याने केलेल्या आक्षेपार्ह कृत्यचा व्हिडिओ त्यालाच पाठवला जातो आणि तिथून सुरू होते ब्लॅकमेलिंग करण्याचा सिलसिला. समाजात आपली अब्रू जाऊ नये म्हणून काही लोक अशा ब्लॅकमेल करणाऱ्यांना पैसे देतात तर काही जण सायबर पोलीस स्टेशन कडे धाव घेतात. जर समोरच्याला पैसे दिले नाही तर तो आपला तो अश्लील व्हिडिओ फेसबुक वर आणि व्हाट्सअप वर असलेल्या मित्रांना पाठवला हे जातो.अशा फेक कॉलला अनेक जण सध्या बळी पडत आहेत .सुरुवातीला ही गंमत वाटते आणि नंतर मात्र ही गंमत जीवावर बेतली जाते.

नगर शहरातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या ही गंमत चांगलीच अंगलट आली होती. गमती जमती त्याने व्हिडिओ कॉल केला आणि सर्वकाही आक्षेपहार्य गोष्टी करून बसला आणि जेव्हा ही गोष्ट अंगलट आली तेव्हा मात्र मग त्या नेत्याची चांगलीच पंचायत झाली होती. अखेर महातप्रयासाने हे प्रकरण मिटवलं गेलं मात्र हा नेता चांगलाच अडचणीत आला होता.

सोशल मीडियावर कोण तरुण कोण म्हातारा हे समजत नसतं फेक अकाउंट वरून समोरच्याला टार्गेट करून त्याच्याकडून बरोबर पाहिजेल ते कृत्य करून घेण्याची एक कला असते आणि त्या कलेच्या माध्यमातून अनेक जणांना ब्लॅकमेलिंग केले गेले आहे. आणि यामध्ये चांगले सुशिक्षित लोकही फसले गेले आहेत हे विशेष रोजच पेपर असेल किंवा वृत्तवाहिनी असतील यामधून याबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध होत असतात पोलीस स्टेशनला अनेक वेळा गुन्हेही दाखल होत असतात सायबर पोलीसही याबाबत जनजागृती करत असतात मात्र तरीही अशा फेक अकाउंट च्या माध्यमातून अनेक जण फसत आहेत. नगर शहरातील तो नेताही कुतूहला पोटी फसला आणि नको ते करून बसला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular