अहमदनगर दि.7 जून
लोकसभा निवडणूक संपली असून निवडणुकीचा निकाल हाती आला आहे सुरुवातीला उमेदवाराचं मताधिक्य त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील मताधिक्य आणि आता थेट प्रत्येक बुथ वरील मताधिक्य समोर आले असून यामुळे आता कोणी काम केले आणि कोणी काम केले नाही याचा सर्वच आकड्यांचा खेळ समोर आला आहे. आता ज्यांनी काम केलं नाही त्यांचे बुरखे नक्कीच फाटले असतील.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला होता त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील हे विजयी होतील असा विश्वास सर्वांनाच होता. आणि दुसरीकडे महाविकास आघाडी कडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली होती. निलेश लंके यांना उमेदवारी देल्यानंतर ही निवडणूक चांगलीच रंगात आली होती. त्यामुळे महायुतीतील सर्वच घटक पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र आणण्याचा आटोकाट प्रयत्न डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. सुरुवातीला आमदार राम शिंदे यांनी खासदारकी आपणाला लढवायची अशी इच्छा प्रकट केली तिथूनच नाराजी नाट्य सुरू झाले होते मात्र अखेर त्यांची नाराजी दूर झाल्याचं समोर आले मात्र ही नाराजी फक्त बातमी पुरतीच होती काय असा आता दिसून येते कारण कर्जत जामखेड मतदारसंघात फक्त 9000 एवढेच मताधिक्य भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना मिळाले असून त्याचप्रमाणे अहमदनगर शहरातही भाजपच्या नगरसेवक असलेल्या उमेदवारांच्या प्रभागांमध्ये भाजपचे मताधिक्य घेतले असले तरी ते घटले आहे. अनेक भाजपचे नेते आणि कार्यकर्ते उघडपणे जरी महायुतीच्या मंचावर दिसत असले तरी अदृश्यपणे ते महाविकास आघाडीलाच साथ देत असल्याचं दिसून येत होते शिवसेनेचे दिलीप सातपुते हे फक्त महायुतीच्या एक-दोन सभांना उपस्थित होते त्यांचे अस्तित्व संपूर्ण निवडणुकीत कुठेही दिसून आले नाही. त्याचप्रमाणे भाजपचे अनेक नेते बरोबर असले तरी ते मनाने महाविकास आघाडीकडेच होते असेच चित्र दिसून येत होते. एवढेच नव्हे तर मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी महायुतीचे उमेदवार मागे पडल्यानंतर काहींनी हे तर होणारच होते आम्ही त्यासाठीच प्रयत्न केला असही बोलून दाखवत होते त्यामुळे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव हा स्व पक्षातील लोकांनीच केला का काय असा आता वाटू लागले आहे.