Home राजकारण अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तारीख बदलली…आता या तारखेला होणार...

अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तारीख बदलली…आता या तारखेला होणार नगर शहरात सभा…

अहमदनगर दिं.२ मे
अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा सहा मे रोजी अहमदनगर मधील उपनगर भागातील संत निरंकारी भवन मागील मैदानावर होणार होती. यासाठी आता जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील पंचवार्षिक निवडणुकीला सुद्धा अहमदनगर मध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचार निमित्त आले होते त्यावेळी ज्या मैदानावर सभा घेतली त्या मैदानावर पुन्हा एकदा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मात्र खात्रीशीर मिळालेल्या माहिती नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा एक दिवसाने पुढे ढकलला असून ७ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता सभा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

१२ एकर क्षेत्र असलेल्या या मैदानावर सभा होणार असून महायुतीची या वेळेच्या लोकसभेच्या निवडणुकीतील पहिलीच भव्य सभा होणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर मध्ये सभा घेऊन या वेळेस काय पुढील पाच वर्षाचा काय अजेंडा देणार याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आज पर्यंत शरद पवार यांच्या तीन सभा नगर जिल्ह्यात झाल्या आहेत अजून तीन सभा घेणार आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांच्यावर काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version