अहमदनगर दि.६ नोव्हेंबर –
फुटबॉल खेळ हा जगातला सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो या खेळामध्ये नगर जिल्ह्यातील खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळाली आहे. शालेय शिक्षणाबरोबर युवकांना क्रीडा स्पर्धेमध्ये करियर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कराळे क्लब हाऊस येथे फुटबॉल खेळाचे मैदान उत्कृष्ट पद्धतीने तयार करण्यात आले आहे. खेळाडूंना सरावासाठी,योग्य मार्गदर्शनाची व सुविधांची आवश्यकता असते ती या ठिकाणी पूर्ण केली आहे. भविष्यकाळात नगर शहरामध्ये उत्कृष्ट प्रकारचे फुटबॉलपटू निर्माण होतील खेळाच्या माध्यमातून युवक निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते. असे प्रतिपादन मा.महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यावेळी केले.

कराळे क्लब हाऊस येथे ग्रीन यार्ड फुटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उद्योजक मोहन मानधना,CA अमित फिरोदिया, महेश कराळे, किशोर वाकळे, कराळे फौंडेशन चे अध्यक्ष – करण कराळे ,युवा सेना जिल्हाप्रमुख रवी भाऊ वाकळे,युवा उद्योजक धवल इंगळे,मनोज आडोळे,महेश गलांडे,रवींद्र गोरे,अभिषेक तांबे,अभिषेक वाकळे,गिरीश जगताप,किशनदादा गायकवाड,श्रीकांत गोरडे,सागर भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
यावेळी संदीप आडोळे म्हणाले की,कराळे क्लब हाउस येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेली ग्रीनयार्ड फुटबॉल प्रीमियर लिगचा बक्षीस वितरण समारंभ अत्यंत थाटामाटात संपन्न झाला.या फुटबॉल लीग चे खास वैशिष्ट्य म्हणजे यात शंभर खेळाडूचे रजिस्ट्रेशन करून,दहा ओनर च्या माध्यमातून त्यांचे ऑकशन करून दहा टीम तयार करण्यात आल्या.अहमदनगर शहरात प्रथमच अशी ऑकशन टूरनामेन्ट खूप दिमाखदार पध्दतीने संपन्न झाली. या लीग मध्ये क्लासिक एस.एस फुटबॉल संघ (टीम ओनर – रवींद्र गोरे) व साई राज ट्रॅव्हल्स फुटबॉल संघ (टीम ओनर – श्रीकांत गोरडे) याच्या मध्ये अत्यंत अटीतटीचा फायनल सामना झाला,पॅनलटी शूट पर्यंत गेलेल्या सामन्यात क्लासिक एस.एस फुटबॉल संघाने 2-1 असे गोल करून साई राज ट्रॅव्हल्स संघावर मात करून चॅम्पियन चषक पटकावला असे ते म्हणाले.
ग्रीन यार्ड फुटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक म्हणून मा.महापौर बाबासाहेब वाकळे यांचे सहकार्य लाभले,प्रथम पारितोषिक 25,555 /- हे कराळे फौंडेशन चे अध्यक्ष मा. करण कराळे यांच्या मार्फत देण्यात आले,व्दितीय पारितोषिक 15555/- युवा सेना जिल्हा प्रमुख रवी भाऊ वाकळे पा.यांच्या मार्फ़त देण्यात आले,त्याच प्रमाणे बेस्ट स्ट्रायकर – अजिंक्य कुटे , बेस्ट डिफेन्डर – वेदांत पाठक , बेस्ट गोलकिपीर – रोहन कुकरेजा यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सर्व टुर्नमेंटचा अत्यंत शिस्तबद्ध , उत्कृष्ट खेळाडू – हुमांशू चव्हाण याला संदीप आडोळे यांच्याकडून स्पोर्ट्स बायसिकल देऊन गौरविण्यात आले.
या भव्य दिव्य टुर्नामेंटचे आयोजन संदीप आडोळे,अभिजित म्हस्के,सुरज गाडेकर व सार्थक खिस्ती यांनी केले होते.