Home Uncategorized प्रभाग क्रमांक १७ मधील सोनेवाडी रोडवरील खड्डे तातडीने बुजवावे-  नगरसेवक मनोज कोतकर...

प्रभाग क्रमांक १७ मधील सोनेवाडी रोडवरील खड्डे तातडीने बुजवावे-  नगरसेवक मनोज कोतकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन

अहमदनगर दि.६ नोव्हेंबर –

प्रभाग क्रमांक १७ मधील सोनेवाडी लगत लोंढे मळा, गुंड मळा, घेंबूड मळा, ठूबे मळा, सातपुते मळा तसेच सोनेवाडी, अकोळनेर परिसरातील नागरीक या रस्त्याचा वाहतुकीसाठी मोठया प्रमाणावर वापर करीत आहेत. सध्या अहमदनगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून उड्डाणपुलाचे मोठमोठे स्लॅब बनविण्याचे काम केडगाव परिसरातील सोनेवाडी रोडवर चालु होते. सदरील मोठमोठे स्लॅब उड्डाणपुलावर टाकण्यासाठी अवजड वाहनांचा वापर केला जातो तसेच अकोळनेर डेपो येथुन पेट्रोल व डिझेलची वाहतूक मोठया टँकरव्दारे सतत केली जाते. सोनेवाडी रोडवर मोठे सिमेंटचे गोडावून असुन मोठे ट्रक सिमेंटची वाहतूक करीत असतात. या सततच्या अवजड वाहनांमुळे या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे.

सोनेवाडी रोडवर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्यांमुळे या परिसरातील नागरीकांना प्रवास करत असताना आपला जीव मोठे धरून करावा लागतो तसेच दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत एखाद्या दिवशी दुर्दैवी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सोनेवाडी रस्त्यावरील खड्डे बुजविणे बाबत सार्वजनिक बांधकाम विभागांने तातडीने उपयोजना कराव्यात आशा आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अभियंता यांना नगरसेवक मनोज कोतकर यांनी दिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version