Homeक्राईमपुणे अपघातातील आरोपी विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल कुटुंबियांचे छोटा राजनशी संबंध? पुण्यातील पबसंस्कृती...

पुणे अपघातातील आरोपी विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल कुटुंबियांचे छोटा राजनशी संबंध? पुण्यातील पबसंस्कृती समूळ नष्ट करा सामान्य पुणेकरांची मागणी

advertisement

पुणे दि.22मे

पुण्यातील (Pune Accident News) कल्याणीनगर परिसरात गेल्या शनिवारी भयानक घटना घडली. प्रसिद्ध बिल्डर विशाल सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने सुसाट कार चालवत दोघांना चिरडलं. या अपघाताप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता, असं स्पष्ट झालं आहे.अपघातापूर्वी अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसोबत बारमध्ये बसलेला होता. त्यानंतरही घरी जाताना त्याने सुसाट कार चालवली आणि दोन जणांचा जीव घेतला. याप्रकरणी मुलाच्या हातात कार दिल्याने पोलिसांनी विशाल सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. त्यांना संभाजीनगर येथून अटकही केली आहे. दरम्यान, अग्रवाल यांच्या कुटुंबियांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले आहे. सुरेंद्रकुमार यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध होते. यापूर्वी देखील खूनाच्या प्रकरणात अग्रवाल कुटुंबियांनी पोलिसांवर दबाव आणल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वादात सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती.अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नांमध्ये सुरेंद्रकुमार यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलिसांत हा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेंद्रकुमार यांनी पोलिसांवर दबाव देखील आणल्याचं समोर आलं आहे.या प्रकरणात आरोपपत्र दाखल होईपर्यंत विशाल अग्रवालच्या वडिलांना अटक झाली नव्हती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नीने अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाच्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. अग्रवाल यांचा मुलगा शाळेत माझ्या मुलाला विनाकारण त्रास होता. यासंदर्भात मी त्याची तक्रार अग्रवाल यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी याकडे लक्ष दिले नाही, असं सोनाली यांनी म्हटलं आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular