HomeUncategorizedअर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणी देवेंद्र गांधी यांना मोठा धक्का पती-पत्नीचे जामीन...

अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणी देवेंद्र गांधी यांना मोठा धक्का पती-पत्नीचे जामीन अर्ज फेटाळले…*

advertisement

अहमदनगर दिनांक 17 मे
अहमदनगर शहरातील 119 वर्षांचे ऐतिहासिक असलेली अर्बन बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज घोटाळा झाला आहे रिझर्व बँकेने ही बँक बंद ही केली असून या बँकेतील कर्ज घोटाळ्या प्रकरणी अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास आहे. काही संचालक आणि कर्जदार अटक झालेले असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये आहेत तर जे आरोपी किंवा बँकेच्या संबंधित आर्थिक घोटाळ्यात सामील असल्याचा संशयित लोक आहेत असे अनेक जण सध्या न्यायालयात धाव घेताना दिसत आहेत.

नगर अर्बन बँकेचे माजी चेअरमन स्वर्गीय दिलीप गांधी यांचे सुपुत्र देवेंद्र गांधी आणि त्यांच्या पत्नी यांनी अर्बन बँक प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अहमदनगरच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता यावर सुनावणी होऊन हा अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

तर याप्रकरणी संगमनेर येथील बडा व्यापारी असलेला एक कर्जदार न्यायालयीन कोठडीत असून त्यांनीही जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. काही माजी संचालकांनी आणि या घोटाळ्यात आरोपी असलेल्या आरोपींनी हाय कोर्टापर्यंत धाव घेतली असून अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आता न्यायालय आणि पोलीस ठेवीदारांच्याच बाजूने धडक कारवाई करत असल्यामुळे घोटाळ्यातील आरोपींची पळापळी सुरू झाली आहे.

अर्बन बँक पाचव्या समितीचे राजेंद्र गांधी हे या प्रकरणी पाठपुरावा करत असून त्यांना साथ देणारे सर्वच ठेवीदार न्यायालयात प्रत्येक सुनावणीस हजर असतात एडवोकेट पिंगळे हे ठेवीदारांच्या बाजूने लढता असून. राजेंद्र गांधी यांनी याप्रकरणी कर्जदारांच्या प्रॉपर्टी जप्त करून त्या विकून ठेवीदारांचे पैसे द्यावे यासाठी जो प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नाला खीळ बसवण्यासाठी काही माजी संचालक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आहेत मात्र हा लढा असा सुरू राहणार असल्याचे अर्बन बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी आणि एडवोकेट पिंगळे यांनी सांगितले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular