पुणे दि.१३ मे
पुणे रेल्वे स्थानकात सकाळी साडेदहा वाजता एक बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली होती यानंतर पोलिसांनी खबरदारी घेत प्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन निर्मनुष्य करून काही काळ रेल्वे वाहतूक बंद करण्याची खबरदारी घेतली होती.
बॉम्ब शोध पथकाने ही संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन त्यानंतर एका खुल्या मैदानात ही वास्तू ठेवण्यात आली होती त्यानंतर आजूबाजूचा परिसरही रिकामी करण्यात आला होता. या वस्तूच्या अवतीभोवती गोण्या ठेवून बॉम्बनाशक पथकाकडून हा स्फोट घडवून आणण्यात आला आणि ही वस्तू निकामी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
दरम्यान, नुकतील पुणे स्थानक उडवून देण्याची धमकी दोघांनी दिली होती. 3 मे रोजी पोलीस कंट्रोल रुमला फोन करुन धमकी देणाऱ्यांमुळे एकच खळबळ उडाली होती. पैसे नाही तर दिले तर रेल्वे स्टेशन उडवून देऊ अशी धमकी देणाऱ्या दौघांना पोलिसांनी अटकही केली होती.
पहा व्हिडीओ
प्रथमदर्शनी ही वस्तू स्फोटकांसारखी नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याचा आता तज्ज्ञ पथकाकडून तपास केला जाणार आहे. त्यानंतर अधिक माहिती देण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.या घटनेनंतर आता पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
ती वासू बॉम्ब नाही आणि जिलेटीन कांड्या नाहीत
बॉम्बसदृश्य वस्तू किंवा जिलेटिनच्या कांड्या सापडल्या आहेत, अशाप्रकारचे वृत्त हे पूर्णपणे चुकीचे आहे, अशी माहिती पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. फटाक्यांच्या रिकाम्या पुंग्या आणि फटाक्यांचे काही प्रमाणात स्फोटके आढळून आली आहेत. तरी नागरिकांनी कुठल्याही अफवांना घाबरू नये, असे रेल्वे पोलिसांचे आवाहन केलंय.