चेन्नई-
महिला आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका महिला प्रवाशाचे प्राण वाचले आहे.चेन्नईतील ईगमोर रेल्वे स्थानकावर एका चालत्या ट्रेन मधून एक महिला उतरत असल्याने त्या महिलेचा तोल गेला आणि ती थेट प्लॅटफॉर्म आणि रेल्वे च्या मध्ये असलेल्या जागेत पडली मात्र या ठिकाणी कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान मथुरी यांनी तातडीने पळत जाऊन त्या पडलेल्या महिलेला हाताने ओढत प्लॅटफॉर्मवर ओढले आणि त्या महिलेचे प्राण वाचले.
साध्य सोशल मीडियावर या प्रसंगांचा उडी वर व्हायरल होत असून यामध्ये आरपीएफ जवान मथुरी यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
पहा व्हिडीओ