अहिल्यानगर दिनांक १६ मार्च
माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा
२१ फेब्रुवारी २०२६ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला असून सध्या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ करत असून मात्र या प्रकरणातील आरोपी पोलिसांना अद्याप सापडला नाही त्यामुळे या प्रकरणातील पीडिता हवालदिल झाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अभिषेक कळमकर याला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी पिडीतेने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. पीडित महिलेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी पुर्ण पणे घाबरुन गेलील असुन मी व माझे कुटुंबीय भयभीत झाले असुन अभिषेक कळमकर जर पोलीसांना सापडत नसेल तर तो किंवा त्याचे गुंड माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांना काहितरी बरे वाईट करु शकतात त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला हात जोडुन विनंती आहे की, सदरचा बलात्कारी अभिषेक कळमकर याला पोलीसांनी तात्काळ अटक करावी व माझ्या कुटुंबियांना व मला या संकटातुन वाचवावे जर आरोपी लवकरात लवकर अटक झाला नाही तर मी येत्या २५ मार्च रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असुन त्यानंतर माझ्या बाबतीत होणाऱ्या सर्व गोष्टींसाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल.
त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस पुढे काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.