अहिल्यानगर दिनांक 22 ऑगस्ट
अहिल्या नगर शहराचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात 21 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी किरण काळे यांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाची सुरुवात 2019 पासूनच सुरू झाली असून पीडित महिला ही कर्जत तालुक्यातील असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात किरण काळे हे निवडणुकीच्या प्रचारानिमित्त कर्जत येथे गेले असताना पीडित महिलेने त्यांचे भाषण ऐकले होते. पीडित महिलेचा पती हा दारू पिऊन तिला त्रास देत असल्यामुळे आपल्याला या त्रासापासून कुठेतरी सुटका मिळावी. कायदेशीर मदत मिळावी यासाठी पीडित महिलेने किरण काळे यांचा मोबाईल नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळवला होता. व त्यानंतर 2021 पासून पीडित महिला आणि किरण काळे यांचे फोनवर संभाषण सुरू झाले होते. आपला पती आपल्याला दारू पिऊन त्रास देऊन मारहाण करत असल्याची तक्रार किरण काळे यांच्याकडे करून आपल्याला या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी कायदेशीर मदत करावी यासाठी तिने किरण काळे यांच्याशी संपर्क साधला होता.
2023 मध्ये किरण काळे यांनी पीडित महिलेला आपण यावर उपाय काढू त्यासाठी तू नगरला ये असा निरोप पाठवून त्या महिलेला नगरला बोलून घेतले होते. ती महिला घरी खोटे बोलून आईला भेटण्यासाठी चालले असे सांगत किरण काळे यांना भेटण्यासाठी नगर शहरात आली होती. नगर शहरातील माळीवाडा बस स्थानक येथे उतरल्यानंतर तिने किरण काळे यांच्याशी संपर्क साधून आपण नगरमध्ये आले असल्याचे सांगितले त्यावर काही वेळातच किरण काळे यांनी स्वतः चार चाकी गाडी घेऊन आले व त्या पीडित महिलेला त्यांच्या चितळे रोडवर ऑफिसवर घेऊन गेले. त्यावेळी तिथे कोणीच नसल्याचा फायदा घेत किरण काळे यांनी महिलेची अंगलट करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने त्याला विरोध केल्यानंतर मी तुझ्या मदतीसाठी आलो आहे. तुला सर्व प्रकारे मी मदत करणार आहे. त्यामुळे तू मला काही विरोध करू नको असं म्हणत पीडित महिलेवर अत्याचार केला. आणि पुन्हा माळीवाडा बस स्थानक येथे पीडित महिलेला किरण काळे यांनी सोडून दिले व याबाबत कोणाला काही कळवल्यास तुला जिवंत सोडणार नाही मला पोलीस काहीच करू शकणार नाही अशी धमकी दिली. घाबरलेली पीडित महिला पुन्हा आपल्या गावी गेल्यानंतर तिने किरण काळे यांच्याशी फोनवर संपर्क करून झालेला प्रकार हा चुकीचा असल्याचा सांगितले. मात्र त्यांनी पुन्हा फोनवर समजूत घालून काही होणार नाही मी तुला तुझ्या नवऱ्याच्या त्रासापासून मुक्ती देतो असे सांगितले. आणि मदत करण्याच्या बहाण्याने नगरला बोलून घेऊन 2023 ते 2024 काळात तीन वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये पीडित महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर 2024 च्या मे महिन्यापासून लोकसभा निवडणूक सुरू झाली आणि किरण काळे यांनी त्या पीडित महिलेशी संपर्क तोडला व तिचे फोन उचलणे बंद केले.
मदत करण्याचे अमिष दाखवुन कोणत्याही प्रकारची पीडित महिलेची घरघुती अडचण सोडविली नाही तसेच पीडित महिलेला घरखर्चाकरिता आर्थिक मदत केली नाही. त्यामुळे पीडित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तसेच तिच्या पतीला किरण काळे यांच्याशी असलेल्या संबंधा बाबत संशय आल्याने पीडित महिलेच्या पतीने तिला जास्त त्रास देण्यास सुरुवात केली. या प्रकरणाबाबत पोलीस स्टेशन पर्यंत जाण्यात पीडीत महिलेला भीती वाटत होती कारण किरण काळे हे मोठे राजकारणी असल्याचे तिला माहीत होते. त्यामुळे पीडित महिलेने तिची चुलत सासू बरोबर संवाद साधून घडलेली हकीगत सांगितली. त्यानंतर पीडित महिलेच्या चुलत सासूने नगर मधील एका ओळखीच्या इसमास सर्व हकीगत सांगून पोलीस स्टेशन पर्यंत जाण्यास मदत करण्याची विनंती केली.त्यावरून अखेर पीडित महिलेने कोतवाली पोलीस स्टेशन येथे येऊन स्वतःवरची आपबीती सांगितली आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेच्या फिर्यादीवरून किरण काळे यांच्या विरोधात बलात्काराचा आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आज कोतवाली पोलिसांनी किरण काळे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने किरण काळे यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.