अहिल्यानगर दिनांक 17 ऑगस्ट :
अहिल्यानगर शहरात प्रथमच साईद्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार आणि अॅड. धनंजय जाधव मित्र मंडळाच्यावतीने ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून संगीतमय साई चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रमुख संयोजक अॅड. पनंजयभैय्या जाधव यांनी दिली. वीस ऑगस्ट ते २६ ऑगस्ट दरम्यान रोज सायंकाळी सहा ते दहा कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
बंधन लॉन येथे बुधवारी (दि. २०) सार्यकाळी सहा वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या कथा सोहळ्याचे उद्घाटन होईल. तसेच येत्या २६ ऑगस्टला राज्याचे जलसंपदामंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते या कथेचा समारोप सोहळा होईल, अशी माहिती अॅड. जाधव यांनी दिली.

माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कथा सोहळा होत असून, त्या परिसराला संत दासगणू नगरी, असे नाव देण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना अॅड. धनंजय जाधव म्हणाले, साईबाबांचे विचार आणि शिकवणी समाजात रुजवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. ‘साई द्वारका सेवा ट्रस्ट’ आणि ‘साईदास परिवारच्या माध्यमातून आम्ही वर्षभर सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. या सर्व उपक्रमांचा उद्देश म्हणजे समाजात एकात्मता, सद्भावना आणि सेवाभावनेचा प्रचार व प्रसार करणे आहे. यावर्षी प्रथमच अहिल्यानगरमध्ये ह. भ. प. समाधान महाराज शर्मा यांच्या संगीतमय अमृतवाणीतून सात दिवसांच्या साई चरित्र कथेचे आयोजन करणे हा आमच्यासाठी गौरवाचा आणि पुण्याचा भाग आहे. नगर शहरात एकूण १४ साईमंदिर आहेत. त्या सर्व मंदिर ट्रस्टींसोबत संपर्क झाला असून, ते सर्वजण या सोहळ्याचा भाग झाले आहेत. हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, तो सर्व समाजाला दिशा देणारा ठरेल. श्रद्धा, सबुरी, सेवा आणि समर्पण, हे साईबाबांचे तत्वज्ञान प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवनात अंगीकारले, तर एक सशक्त, सजग आणि समृद्ध समाज निर्माण होईल, असे ते म्हणाले.
महाप्रसादाचे हे आहेत अन्नदाते..!
कथा संपल्यानंतर दररोज महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दररोज किमान दोज हजार भाविकासाठी महाप्रसाद बनविण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या दिवशी अहमदनगर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता सोमनाथ गाडळकर, दुसऱ्या दिवशी तेजस कथडे, स्वप्निल होले, सिद्धार्थ मुथियान, तिसऱ्या दिवशी माजी नगरसेवक निखिल वारे, चौथ्या दिवशी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, पाचव्या दिवशी उद्योजक चैतन्य जाधव, सहावा दिवशी…. आणि सातव्या दिवशी सामुहिक महाप्रसाद असेल.
वॉटरप्रुफ मंडप अन् ४ हजार भाविकांची आसन व्यवस्था..!
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून तब्बल २०० बाय ९० फुटांचा भव्य वॉटखुफ मंडप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, या मंडपात साधारणपणे ४ हजार भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी येथे प्रशस्त पार्कीगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मंडपातील १७ बाय ५० फुटावरील भव्य व्यासपीठावरुन ह. भ. प. समाधान महाराज शर्मा ही संगीतमय कथा भाविकांना ऐकविणार आहेत. समाधान महाराज यांच्यासोबत त्यांची १५ जणांची टीम आहे.
ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून संगीतमय साई चरित्र ऐकायला मिळणे, ही अहिल्यानगरांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. नगर शहरात असा संगीतमय भक्तीसोहळा प्रथमच होत आहे. त्यात सर्व नगरकरांनी सहभागी व्हावे. अखेरच्या दिवशी सामुहिक महाप्रसाद असेल. त्यामध्ये भाविकांना आपले योगदान देवून सहभागी होता येईल. ज्यांना यात योगदान देवून सहभागी व्हायचे आहे, त्या भाविकांनी ८८८८८१७७९८, ९५४५५६७०८८, ९९२१५९७४४२ किंवा९८६०६५५५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन अॅड. धनंजय जाधव यांनी केले आहे.