अहिल्यानगर दिनांक 17 ऑगस्ट
नगर शहर भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली असून शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे या मध्ये माजी नगरसेवक निखील वारे यांना सरचिटणीस पदी नियुक्ती देण्यात आली आहे. पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे असलेले माजी नगरसेवक निखिल वारे लोकसभेच्या निवडणुकी आधीपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून भारतीय जनता पार्टीचे काम करत होते.मात्र अनेक वेळा ते पक्षात प्रवेश करणार का यावर चर्चा होत असताना अखेर आता त्यांना भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस हे पद देऊन पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.

इतर निवड झालेली नावे
उपाध्यक्ष सौ. दिप्ती सुवेंद्र गांधी, श्रीमती. मालनताई ढोणे,बाळासाहेब भुजबळ, ज्ञानेश्वर काळे,उदय अनभुले, नितीन शिवाजी शेलार,साहेबराव विधाते , गोपाल मुरलीधर वर्मा
सरचिटणीस निखील वारे अशोकराव गंगाधर गायकवाड,महेश राजाराम नामदे, ज्योती गणेश दांडगे , मिलिंद भालसिंग, स्वप्निल दगडे, पियुष जग्गी , चंद्रकांत पाटोळे, विजय गायकवाड,राहुल मुख्या कोषाध्यक्ष चिटणीस
कार्यालयीन मंत्री श्री. मुकुल गंधे, अनुसूचित मोर्चा श्री. संजय गायकवाड,
युवा मोर्चा अध्यक्ष श्री. रुद्रेश बंबाडे
ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री. गणेश विद्ये
आदिवासी मोर्चा अध्यक्ष श्री. वैभव सुरवसे
प्रसिद्धी प्रमुख श्री. शशांक कुलकर्णी
श्री. अविनाश वाणी संवादक ओपन युवामोर्चा अध्यक्ष ओपन
महादेव गाडे
उद्योग आघाडी निनाद टिपुगडे
व्यापारी आघाडी श्री. महेश गुगळे
वैद्यकीय सेल डॉ. धैर्यशील केवळ
कायदा सेल श्री. चंदन बारटक्के
ट्रान्सपोर्ट सेल सौ. प्रियांका हेमंत चौधरी
सोशल मिडिया श्री. सार्थक आगरकर
शिक्षक सेल श्री. वैभव भास्कर सांगळे
आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ श्री. मयुर जोशी पदवीधर प्रकोष्ठ श्री. दामोदर बठेजा
क्रीडा प्रकोष्ठ श्री. आदित्य संजय धोपावकर
जैन प्रकोष्ठ श्री. रवींद्र बाकलीवाल
सांस्कृतिक सेल श्री. पुष्कर तांबोळी
आय.टी. सेल श्री. रोहित अशोक तोलानी आयुष्यमान भारत सेल श्री. राजू वाडेकर