मुंबई दि.४ जून
हिंदी चित्रपट सृष्टीचा नायक सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. सलमान खानचा लवकरच सिद्धू मूसेवाला होणार असे या पत्रात उल्लेख आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. सलीम खान मॉर्निंग वॉक करून जिथे थांबतात तिथे धमकीचे पत्र सलीम खान यांच्या सुरक्षारक्षकाला मिळालं त्यामुळे पोलिसांनी आता सलमान खान आणि सलीम खान यांच्या सुरक्षिततेत वाढ केली आहे. हे पत्र नेमके कुठून आले अथवा कोणी या ठिकाणी ठेवले याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे.