Homeक्राईममहात्मा फुले, समता परिषदेच्या वतीने पोलिस अधिक्षकांना निवेदन. व्यापारी नितीन चिपाडे यांच्यावर...

महात्मा फुले, समता परिषदेच्या वतीने पोलिस अधिक्षकांना निवेदन. व्यापारी नितीन चिपाडे यांच्यावर हल्ला करणारे आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी.

advertisement

अहमदनगर दि.१५ एप्रिल

कांदा व्यापारी नितीन दत्तात्रय चिपाडे यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी समता परिषदेचे महानगर अध्चयक्ष दत्ता जाधव, अंबादास गारुडकर, भगवान फुलसौंदर, अ‍ॅड.अभय आगरकर, बाळासाहेब बोराटे, शरद झोडगे, मंगल भुजबळ, परेश लोखंडे, बबलू चिपाडे, योगेश भुजबळ, सुनिल ससाणे, विक्रांत राऊत, सुरेश पडोळे, अ‍ॅड.बाबू रासकर, सचिन रासकर, गजानन ससाणे, संदिप भांबरकर, नितीन भुतारे, अर्जुन बोरुडे, अशोक रसाळ, दत्ता बनकर, जालिंदर बोरुडे, केदार रासकर, मळू गाडळकर, स्मिता अष्टेकर आदिंसह मोठ्या संख्येने समता परिषद पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.


निवेदनात म्हटले आहे की, कांदा व्यापारी नितीन दत्तात्रय चिपाडे यांना दि.13 एप्रिल 2023 रोजी मार्केट यार्ड परिसरामध्ये गुंडांनी जमाव करुन शस्त्रासह प्राणघात हल्ला केला, असे असतांना त्यांना कोणतेही मदत मिळाली नाही व संरक्षणही मिळाले नाही. सदर गुंड आरोपी हे शहरांमध्ये राजरोस पणे मोकळे फिरत आहेत. त्यांच्यावर अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व चिपाडे यांच्या कुटूंबाला वारंवार धमक्या दिल्या जातात की गुन्हा मागे घ्या, नाहीतर आम्ही तुमचं राहणं मुश्किल करु, अशी धमकी दिली जात असून तरी सदर गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून चिपाडे कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे कुटुंबाला व त्यांना पोलीस संरक्षण द्यावे व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे…..

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular