Home क्राईम नगर अर्बन बँक घोटाळ्यातील व्हाईट कॉलर आरोपी अमित पंडित याला नाट्यमयरीत्या अटक…...

नगर अर्बन बँक घोटाळ्यातील व्हाईट कॉलर आरोपी अमित पंडित याला नाट्यमयरीत्या अटक… पोलिसांनी शोध शोध लावला मात्र पंडित घरातच लपून बसला… तिसरी अँख खुल गयी गई और पंडित की जेल की राह खुल गयी…

अहमदनगर दि.१६ मार्च
कधीकाळी सर्वसामान्यांची बँक म्हणून लौकीक
असलेल्या नगर अर्बन बँक घोटाळ्याचे ओघळ आता
थेट संगमनेरपर्यंत पोहोचले आहेत. सुमारे अडिचशे
कोटी रुपयांच्या या महाघोटाळ्याच्या तपासात
बनावट कागदपत्रांसह मिळकतीचे दाखले व दस्त
सादर करुन संस्थेची मोठी आर्थिक फसवणूक
झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संचालकांसह
अशा प्रकरणांना जबाबदार असलेल्या कर्जदारांनाही
कायद्याच्या कक्षेत घेण्यास सुरुवात झाली असून
संगमनेरचे प्रख्यात उद्योजक, अमृतवाहिनी बँकेचे
माजी चेअरमन अमित पंडित यांना संगमनेर शहर
पोलिसांनी अटक केली आहे. या वृत्ताने उद्योग
क्षेत्रासह सहकार क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
पंडित माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक
म्हणून ओळखले जातात.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या शहर माहितीनुसार पोलीस अधीक्षक राकेश यांनी अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी अमृतवाहिनी बँकेचे माजी चेअरमन अमित पंडित यांना अटक करण्याचे आदेश दिले. मात्र तत्पूर्वीच पंडित यांना अटकेची कुणकून लागल्याने ते मोबाईल बंद करुन भूमिगत झाले. त्यामुळे पोलिसांना त्यांना शोधण्यासाठी जंग जंग पछाडावे लागले. आज शहरातील एका मोठ्या व्यापाऱ्याच्या कन्येचा विवाह सोहळा आहे. तेथे त्यांची हमखास उपस्थिती गृहीत धरुन साध्या वेशातील पोलिसांनी मंगल कार्यालय पालथेही घातले, मात्र काहीच मिळाले नाही.

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास अमित पंडित यांच्या घरावर छापा घातला.यावेळी घर झडतीतही त्यांचा शोध लागला नाही. मात्र ते घरातच असल्याचा दाट संशय असल्याने पोलिसांनी प्रत्येक खोलीची आणि घराच्या कानाकोपऱ्याची सखोल तपासणी केली असता
पंडित त्यांच्याच शयनकक्षात नाट्यमय पद्धतीने लपून बसल्याचे आढळले. त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्या घरासह त्यांच्या पेट्रोल पंपाचीही झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह उपनिरीक्षक रमेश पाटील, सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे व हरिश्चंद्र बांडे यांचा सहभाग होता. या कारवाईने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version