Homeशहरसावित्री-फातेमा विचार मंचची ‘सामाजिक ऐक्य परिषद’ संपन्न अहमदनगर जिल्ह्याला महान ऐक्याचा...

सावित्री-फातेमा विचार मंचची ‘सामाजिक ऐक्य परिषद’ संपन्न अहमदनगर जिल्ह्याला महान ऐक्याचा वारसा – अ‍ॅड.संभाजी बोरुडे

advertisement

अहमदनगर दि.४ ऑक्टोबर –
महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्याला लाभलेल्या महान ऐक्याच्या वारशाचे सप्रमाण व ऐतिहासिक दाखले देतांना मालोजी राजांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे अनुक्रमे शहाजी व शरीफजी अशी ठेवली, ती शाहशरीफ बाबांच्या प्रति असलेल्या परम आदरामुळेच. शिवरायांच्या मावळ्यात असलेल्या अनेक निष्ठावंत मुस्लिम सरदारांचे दाखले देऊन हाच ऐक्याचा वारसा सावित्रीमाई फुले व फातेमाबी शेख यांनी जोपासला व महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडविली. असे अनेक दाखले देत, शहा शरीफ बाबांच्या दर्गाह शहरातील उड्डाणपुलाच्या खाली रंगविण्यात आलेल्या सचित्र शिवचरित्रात समावेश करावा, अशी मागणी अ‍ॅड.संभाजी बोरुडे यांनी केली.

सावित्री-फातेमा विचार मंच, अहमदनगरच्यावतीने ‘सामाजिक ऐक्य परिषदेचे’ आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षीय भाषणात डॉ.रफिक सय्यद यांनी पैगंबरांच्या ‘हदीसे सफिना’चा आवर्जुन उल्लेख करुन समस्त मानवजात एकाच नौकेतील प्रवाशांसमान असून, काही मूठभर माथेफिरु नौकेच्या तळात छेद घेत असतील तर इतर प्रवाशांचे निश्चिंतपणे बसणे कदापि योग्य नव्हे. कारण ज्याक्षणी हे मूठभर लोक नौकेच्या तळात छेद घेतली व नौका गर्क होईल ती केवळ त्या मुठभर माथेफिरुंनाच घेऊन नव्हे तर समस्त प्रवाशांना जलसमाधी लाभेल. अर्थात समाजरुपी नौकेची सुरक्षा करणे हे प्रत्येक प्रवाशाचे आद्यकर्तव्य आहे, ही पैगंबारांची भुमिका आहे.
याप्रसंगी आनंद महाराज तनपुरे, हभप प्रा.अशोक शिंदे, हभप गणेश महाराज काळे,हभप सोपानकाका औटी महाराज, मुकुंदराव सोनटक्के, प्रा.स्मिता पानसरे, डॉ.सुनैम सय्यद, संदिप पाल महाराज, विनोदसिंग परदेशी, कर्नल सोमेश्वर गायकवाड, कोतवालीचे पो.नि.चंद्रशेखर यादव, हभप गणेश महाराज काळे, निजामभाई शेख, हभप बाळासाहेब धोत्रे, हभप गट महाराज, संजय झिंजे, बाळासाहेब मिसाळ, जयसिंग बोरुडे, विजयराव चव्हाण, हभप सोपानकाका औटी, बौद्धाचार्य राजेंद्र करंदीकर यांनी समयोचित विचार व्यक्तकेले.

सर्वांनी हातहात घालून उंचावत एकात्मतेचा संदेश दिला. सदरप्रसंगी प्रा.कवी दशरथ शिंदे यांनी ‘शिवरायांच्या राज्यात आनंदाने नांदत होते हिंदू-मुस्लमान’ ही कविता सादर केली. प्रास्तविक प्रा.शफी फारुकी यांनी तर सूत्रसंचालन मुकुंद सोनटक्के व डॉ.साजीद सय्यद यांनी केले. सदरप्रसंगी मान्यवर सर्वधर्मिय बंधू-भगिनींची उत्स्फुर्त उपस्थिती होती.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular