Home Uncategorized सावेडी फटका मार्केट या वर्षी गांग उद्यानच्या मागील भाव्यदिव्या मैदानात …दिवाळीला फटाक्यांचा...

सावेडी फटका मार्केट या वर्षी गांग उद्यानच्या मागील भाव्यदिव्या मैदानात …दिवाळीला फटाक्यांचा होणार धूमधडाका

अहमदनगर दि.१६ ऑक्टोबर

लक्ष्मीपूजनानंतर फटाके वाजले नाहीत तर दिवाळी साजरी केल्यासारखे वाटणारच नाही, दिवाळी व आतषबाजीचे एवढे समीकरण जुळले आहे. यंदा शहरात तीन ठिकाणी मोठे फटाका मार्केट उभारले जात असून नगर कल्याण रोड ,नगर मनमाड रोड वरील सावेडी बस्थानाका जवळ आणि सावेडी उपनगर मधील मुख्य फटाका मार्केट हे या वर्षी गंगा उद्यान मागील महानगर पालिकेच्या मालकीच्या भव्य आशा मोकळ्या जागेत उभारण्यात येणार असून लवकरच या ठिकाणी स्टॉल उभारण्याचे काम सुरू होणाऱ असल्याची माहिती सावेडी उपनगर फटका असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य बोरकर यांनी दिली आहे.

शिवकाशीहून येणाऱ्या फटाक्यांमध्ये यंदा नावीन्यपूर्ण फटाके बघण्यास मिळणार आहेत; पण त्यात सुतळी बॉम्ब, रॉकेट, फटाक्यांची लड, भुईनळे सर्वांत लोकप्रिय फटाके आहेत. गंगा उद्यान मागील मैदानावर 14 दुकाने उभारण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी पार्किंगची व्यवस्था असून ग्राहकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी स्टॉल धारक घेणार आहेत. हे सावेडी उपनगर मधील सर्वात जुने फटाका मार्केट असून सुरुवातीला जॉगिंग पार्क येथे सर्व दुकाने लावली जात होती मात्र महानगरपालिकेने तिथे दुकाने लावण्यासाठी बंदी घातल्यानंतर आता गंगा उद्यान मागील मोकळ्या जागेत दुकाने उभारण्यात येणार आहे.

या ठिकाणी पत्र्यांच्या शेडची दुकाने उभारली जात आहेत. प्रत्येक दुकानादरम्यान ५ फुटांचे अंतर सोडण्यात आले आहे. प्रत्येक दुकानासमोर अग्निशमन यंत्र, पाण्याने व वाळूने भरलेले ड्रम असतील. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधी नंतरची यंदा बंधनमुक्त दिवाळी साजरी केली जाणार आहे. यामुळे फटाके मोठ्या प्रमाणात विक्री होईल, अशी शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version