Home शहर धैर्यशील उर्फ अजित लक्ष्मणराव वाडेकर यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून निवड

धैर्यशील उर्फ अजित लक्ष्मणराव वाडेकर यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून निवड

अहमदनगर दि.२० सप्टेंबर

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नुकतीच 23 सहाय्यक सरकारी अभियोक्ता (Assistant Public Prosecutor ) यांची नेमणूक केलेली आहे. जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक ,संचालक सरकारी अभियोक्ता कार्यालय नाशिक यांच्या पॅनल मार्फत मुलाखत व लेखी परीक्षा घेतल्या नंतर पात्र उमेदवारांची घोषणा होते.ही नेमणुक पुढील आदेशापर्यंत असते तसेच सरकारच्या वतीने कोर्टात काम करणे म्हणजेच सर्व सरकारी कार्यालयाच्या वतीने तसेच सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यातचे काम पाहणे तसेच पोलीस स्टेशनचे देखील सरकारी वकील म्हणून काम पाहणे सरकारी अभियोक्ता जबाबदारी पहावी लागते.

नगर शहरातील ऍड. धैर्यशील उर्फ अजित लक्ष्मणराव वाडेकर यांची नुकतीच सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून निवड झाली असून वाडेकर हे गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय येथे वकील व्यवसाय करीत आहेत. प्रामुख्याने फौजदारी, दिवाणी व इतर सर्व प्रकरणे पाहतात. आणि संस्थेमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून देखील काम करत आहेत. माजी सरकारी वकील कैलासवासी एड.लक्ष्मण वाडेकर यांचे ते चिरंजीव आहेत. अजित वाडेकर यांचे निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version