मुंबई दि.१५ ऑक्टोबर
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध कामगिरी, गुणवत्तापूर्ण सेवा, उत्कृष्टसेवा यांसाठी जाहीर झालेल्या पोलीस पदकांचा अलंकरण समारंभ १३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथेराजभावनाच्या दरबार हॉल मध्ये पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम दादापाटील डांगे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal for Distinguished Service ) देऊन सन्मानित करण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील प्रीतिसुधाजी संकुलचे संस्थापक इंद्रभानजी डांगे यांचे ते बंधू आहेत.
त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे अभिनंदन केले आहे.