अहिल्या नगर दिनांक 9 फेब्रुवारी
नगर शहरातील केडगाव उपनगरातील उदयनराजे नगर मधील एका विद्यालयातील प्राचार्याने अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली असून अभ्यासासाठी घरी येत असलेल्या शालेय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याची तक्रार अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
संतोष देवरे असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव असून संतोष देवरे ओआयसीस महाविद्यालय समोर राहत असून तो
अल्पवयीन मुलास अभ्यासाच्या नावाखाली स्वतःच्या रूममध्ये बोलवून घेत असे आणि त्या ठिकाणी अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करत असे तसेच जर ही गोष्ट घरी सांगितली तर आईवडीलांना मारुन टाकु अशी धमकीही प्राचार्य संतोष देवरे हा त्या अल्पवयीन मुलास देत होता.
प्राचार्य असलेल्या संतोष देवरे याच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलाच्या आईच्या फिर्यादी वरून 176 / २०२५ बी एन एस २०२३ चे कलम ३५१ ( २ ) सह लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहेत.