अहिल्या नगर दिनांक 8 फेब्रुवारी
कल्याण येथील फ्रुट मर्चंट असलेल्या पंकज कुमार मुरली प्रसाद वर्मा हे नगर शहरातील मार्केट मधून फळे खरेदी करून कल्याण येथे फळविक्रीचा व्यवसाय असून. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पंकजा कुमार वर्मा हे नगर मधील फळ मार्केट मध्ये खरेदी साठी आले असताना फळ मार्केट मध्ये तीन अनोळखी इसम आले आणि त्यांनी वर्मा यांना दम भरत
‘मुझे अभी पता चला है की तू यहाँ पर व्यापार करता है, तुझे यहाँ व्यापार करना है तो मुझे पाच हजार रुपये महिना देना पड़ेगा, तुम मुझे जानता नही में इधर का डॉन सॅम ख्वाजा हु’ असे म्हणून शिवीगाळ केली. त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमानी वर्मा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेने वर्मा हे घाबरून गेले. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे फिर्याद न देता कल्याणला निघून गेले होते.
मला मायांनी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये ७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी सॅम ऊर्फ समीर शेख याच्यासह दोन अनोळखी इसमाविरुद्ध भा.न्या.सं. ३०८ (५) ११५ (२) ३५१ (२) ३५२, ३ (५) अन्वये गुन्ह्याची नोंद केली, असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सेदवाड हे करीत आहे.