Home विशेष शनी चौथऱ्यावरून तेल अभिषेक करण्याची संधी मात्र मोजावे लागणार पैसे,श्री शनैश्वर देवस्थानचा...

शनी चौथऱ्यावरून तेल अभिषेक करण्याची संधी मात्र मोजावे लागणार पैसे,श्री शनैश्वर देवस्थानचा निर्णय; देणगी पावतीची सक्ती

सोनई दि. १८ जून

शनि शिंगणापू येथे भाविकांना आता शनी चौथऱ्यावरून जाऊन तेल अभिषेक करता येणार आहे. श्री शनैश्चर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी ही माहिती दिली.

तेल अभिषेकासाठी स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही चौथऱ्यावर प्रवेश मिळणार आहे. मात्र त्यासाठी भाविकांना ५०० रुपये देणगीची पावती ट्रस्टकडून घेतल्यानंतरच भाविकांना चौथऱ्यावर तेल अभिषेकासाठी जाता येईल.

देश आणि परदेशातूनही भाविक श्री शनैश्चराच्या दर्शनासाठी शनि शिंगणापूरला मोठी गर्दी करतात. वर्षभर भाविक भक्तांचा मोठा ओघ शनि शिंगणापूरला असतो. गेल्या अनेक दिवसांपासून शनी भाविकांची चौथऱ्यावरून जाऊन तेल अभिषेक करता प्रवेश देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर
गर्दी, सुरक्षा, तेलाच्या निसरडेपणातून अपघात होऊ
नये या कारणातून पादुकापर्यंत सं स्त्री पुरुष भाविकांना प्रवेश दिला जाऊ लागला.

आता स्त्री-पुरुष भाविकांना तेल अभिषेक करावयाचा असेल, अशा भाविकांना श्री शनैश्चर देवस्थान ट्रस्टची ५०० रु. देणगी पावती घेऊन शनी चौथ-यावर अभिषेक करता येईल. तेल अभिषेक पावतीकरिता भाविकांनी देवस्थानचे तेलविक्री काउंटरदेणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बानकर यांनी केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version