अहमदनगर दि.१६ फेब्रुवारी
शेंडी गावातील सरपंच प्रयागा प्रकाश लोंढे यांना गावातील काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली असून गावातील कचरा टाकण्याकरीता खड्डा करण्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे मात्र या घटनेला जातीय रंग देऊन लोंढे यांना झालेली मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट प्रसाद खामकर या व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली असून या मुळे गुण्यागोविंदाने राहत असलेल्या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं प्रयत्न खामकर या व्यक्तीने केला आहे.
कचरा टाकण्याच्या कारणावरून अहमदनगर शहरा शेजारी असलेल्या शेंडी गावातील सरपंच प्रयाग लोंढे यांना मारहाण करण्यात आली आहे या मारहाणी विरोधात लोंढे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान सरपंच लोंढे यांना झालेली मारहाण ही मराठा ओबीसी वादातून झाली असल्याची पोस्ट प्रसाद खामकर या व्यक्तीने सोशल मीडियावर टाकली मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंदच्या दिवशी लोंढे यांनी आपले दुकान उघडे ठेवले म्हणून मारहाण झाल्याची खोटी पोस्ट काम कर यांनी केली होती. या पोस्टमुळे दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने रामदास जरांगे यांनी तक्रार दाखल केली असून त्या नुसार तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये प्रसाद खामकर यांच्या विरोधात कलम 501 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे