Home Uncategorized चापडगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त नऊ जुगारी ताब्यात...

चापडगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त नऊ जुगारी ताब्यात मी संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई

अहमदनगर दि.१९ डिसेंबर

शेवगाव तालुक्यातील चापडगाव जवळच असणाऱ्या गदेवाडी रोडवर एका शेतामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या पथकातील कर्मचाऱ्यांसह जुगार अड्ड्यावर छापा टाकून नऊ लोकांना जुगार खेळताना पकडले आहे या जुगार खेळणाऱ्या लोकांकडून सुमारे चार लाख 66 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

कुंदन संभाजी मडके (वय 30 वर्ष रा सोनई सांगवी ता शेवगाव) ,बाबासाहेब एकनाथ मस्के (रा. आखातवाडा ता. पैठण जि.औरंगाबाद) भगवान अर्जुन झिरपे (वय 47 वर्षे रा. कोळगाव ता.शेवगाव) रामकिसन नारायण कोलाळे( वय 50 वर्ष रा. गदेवाडी ता.शेवगाव) भगवान बापूराव झिरपे (वय 47 रा. कोळगाव ता. शेवगाव) भगवान विष्णू ढाकणे (वय 43 वर्ष रा. हसनापूर तालुका
शेवगाव) बाप्पासाहेब त्र्यंबक विघ्ने( वय 40 वर्ष रा. कोर्टाच्यामागे शेवगाव) काकासाहेब भाऊसाहेब घोरतळे (रा बोधेगाव ता शेवगाव) विनोद दत्तात्रेय नेमाने ( वय 30 वर्ष रा. चापडगाव ता शेवगाव.) या  सर्व आरोपी विरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे पो.कॉ.नितीन चव्हाण यांच्या फिर्यादिवरून मुंबई जुगार कायदा कलम 12( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,Dysp संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई दादाभाई मगरे,स.फौ.राजेंद्र आरोळे,पो.हे.कॉ सुरेश औटी,पो.कॉ नितीन चव्हाण,पो कॉ नितीन शिरसाठ आदींनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version