Home शहर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक मार्गावरील पहिल्या टप्प्यातील रस्ता कॉंक्रिटीकरण...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक मार्गावरील पहिल्या टप्प्यातील रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर नगर शहराचा शाश्वत विकास हाच अजेंडा – आ.संग्राम जगताप

अहमदनगर दि.२६ ऑगस्ट
राज्य सरकारच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने मोठा निधी प्राप्त होत आहे, त्यानुसार कायमस्वरूपी व नियोजनबद्ध विकासाची कामे सुरु आहे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक मार्गावरील पहिल्या टप्प्यातील नगर शहरातील प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी राज्य सरकारकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, तरी उर्वरित मिरवणूक मार्गावरील दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच मंजूर होईल, या माध्यमातून नगर शहराचा शाश्वत विकास हाच अजेंडा आम्ही राबवत आहे, या रस्त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय व जिल्ह्याचे माळीवाडा बसस्थानक असून जिल्हाभरातील विद्यार्थी, महिला, नागरिक आपल्या विविध कामांसाठी नगर शहरात येत असतात, हा रस्ता शहरातील रहदारीचा मुख्य रस्ता आहे, नागरिकांची येथे दिवसरात्र वर्दळ असते, पण हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या माध्यमातून रस्त्याचा कायमस्वरुपीचा प्रश्न मार्गी लावला आहे.

स्वस्तिक चौक ते आयुर्वेद कॉर्नर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवाडा वेशीपर्यत व प.पु. आनंदऋषीजी म.सा. यांच्या समाधीस्थळापासून ते स्वस्तिक चौकापर्यंतची रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे मार्गी लगली आहे, टप्प्याटप्प्याने शहरातील एक एक प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागत आहे असे आ.संग्राम जगताप सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version