अहमदनगर दिनांक 29 फेब्रुवारी
अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी यांच्याविरुद्ध 376, 376(2)(एन) 315, 323, 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून सचिन जाधव यांची ओळख होती.
नगर शहरातील एका महिलेने त्यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करताना प्रेम करून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद नोंदवली आहे त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शिवसेनेमध्ये जेव्हा भूकंप झाला त्यावेळी सर्वात प्रथम सचिन जाधव हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या गटात सामील झाले होते माजी नगरसेवक ते थेट शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली होती मात्र त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.