अहिल्यानगर दिनांक 22 डिसेंबर
अहिल्यानगर महानगर पालिकेच्या रणधुमाळीमध्ये रंगत वाढतच चाललीय. प्रत्येक पक्ष आपापल्यापरीने जनतेसमोर जाण्यासाठी तयारी करताना दिसून येत आहे.त्याचा प्रमाणे इच्छुक उमेदवार सुधा प्रभागाच्या विकासाठी आपली भूमिका मांडताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक ९ (ड) मधून इतर मागासवर्गीय गटाचे उमेदवार म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव हे रिंगणात उतरले आहेत.

राजकारणासाठी नव्हे तर समाजसेवेसाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरलो आहे. आजपर्यंत मी राजकारणातून समाजकारण करीत आलोय. जनतेच्या सेवेसाठीच मी उभा आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून असो किंवा नसो गोरगरिबांच्या हाकेला मी धावून जातच असतो. सर्वसामान्य गोर गरीब बंधू, भगिनी, माता प्रत्येकवेळी माझ्याकडे आशेने येतात. त्यावेळी मी त्यांची कामे करून देतो. अनेक काम प्रभागात प्रलंबित आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि याच प्रश्नांवर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे गिरीश जाधव यांनी सांगितलं.