Homeशहरनगर शहरात बे कायदेशीर ताबा मरणाऱ्यांविरोधत शिवसेनेची वज्रमूठ...

नगर शहरात बे कायदेशीर ताबा मरणाऱ्यांविरोधत शिवसेनेची वज्रमूठ…

advertisement

अहमदनगर दि .३० जुलै

नगर शहरात सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तांवर गुंडांमार्फत ताबा घेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून या ताबा मारणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच या ताबा मारणाऱ्यांना खोटी कागदपत्रे तयार करण्यात मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी,
अशी मागणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व राहुरी मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे हेही उपस्थित होते.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख
प्रा. शशिकांत गाडे, युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, अमोल येवले, नगरसेवक
बाळासाहेब बोराटे,अशोक दहिफळे, परेश लोखंडे संजय आव्हाड, प्रशांत भाले, मुन्ना भिंगारदिवे, अरुण झेंडे, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, शरद कोके, अक्षय नागापुरे, यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते हेही उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनतेला दमदाटी करुन त्यांच्या जागा परस्पररित्या बळकवण्याचे प्रकार होत आहे. जे लोक परगावी राहतात व ज्यांच्या जागा नगरमध्ये आहेत,त्या जागांवर परस्पर सातबाऱ्यावर नोंद करुन त्या जागा हडप केल्या जात आहेत या प्रकरणात प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला असून खोट्या व्यक्ती उभ्या करुन, खोट्या सह्या करुन हे प्रकारघडत आहेत. याबाबत संबंधितांनी तक्रार केल्यास अशा कुटूंबाना पुन्हा धमकावण्याचे प्रकार सुरु आहेत. वास्तविक हे गुंड प्रवृत्तीचे लोक प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना हाताशी धरुन अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत विचारणा
केल्यास अधिकारीही दिशाभुल करत आहेत, अशा अधिकाऱ्यांचीही चौकशी करुन कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

 

स्वतंत्र चौकशी अधिकारी नेमावा

सेच ज्यांच्या जागा – जमिनी बळकावल्या

आहेत, त्यांना त्या मिळाल्या पाहिजे. याबाबत आपण स्वत: लक्ष घालावे. यासाठी चौकशी समिती नेमून एक महिन्याच्या आत ती पूर्ण करुन संबंधितांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आम्हाला पुन्हा तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

तक्रारदारांसाठी जनता दरबार भरवा
यावेळी विक्रम राठोड यांनी कब्जा केलेल्या
जागा मालकांचे अनुभव सांगितले. अनेक कब्जा केलेले जागेचे मुळ मालक आपल्या कागदपत्रासह यावेळी उपस्थित होते, त्यांनीही त्यांचे अनुभव जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी आ. निलेश लंके व आ. प्राजक्त तनपुरे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, ज्या प्रमाणे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते, त्या पद्धतीनेच या नागरिकांना न्याय मिळण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करुन या गोर-गरीब
जनतेला न्याय मिळावा, अशी मागणी केली.
आले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular