Homeराजकारणआवाज कोणाचा...शिवसेनेचा... नगरकरांच्या हक्काचा आवाज झाला क्षीण... नगर मधील शिवसेनेच्या दोनच वाघांची...

आवाज कोणाचा…शिवसेनेचा… नगरकरांच्या हक्काचा आवाज झाला क्षीण… नगर मधील शिवसेनेच्या दोनच वाघांची डरकाळी सध्या ऐकायला मिळतेय …

advertisement

अहमदनगर दि. १२ डिसेंबर

अहमदनगर शहरात आवाज कुणाचा शिवसेनेचा… ही आरोळी नगरकरांच्या आंगवळणी पडली होती. अन्याय, अत्याचार कोणत्याही समस्या असतील त्या विरोधात शिवसेना आक्रमकपणे आंदोलन करून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र अनेक वर्ष नगरकरांनी पाहिलं होतं. त्यामुळेच जवळपास 25 वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांनी नगर शहरावर राज्य केलं होतं.

नगर शहर आणि शिवसेना एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. जिथे प्रश्न सुटत नाही तिथे शिवसेना प्रश्न सोडवेल असंच काहीसं गणित नगर शहरात झालं होतं. सरकारी काम असो पोलीस स्टेशन असो किंवा इतर काही समस्या असतील तर शिवसेनेचे शिवालय हे नगरकरांसाठी 24 तास उघडे असायचे. मोबाईल आमदार म्हणून स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांनी आपली ओळख निर्माण केली होती. समस्या कोणाचीही असो फोन आला की ती समस्या सोडवण्याचे काम शिवसेना करत असे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचा आवाज मात्र क्षीण होत चालला आहे. नगर शहरात शिवसेनेच्या वाघांच्या डरकाळ्या आता ऐकूही येत नाही. अनिल भैय्या राठोड यांचे निधन आणि त्यानंतर हळूहळू शिवसेनेत होत गेलेले मतभेद महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या मोठ्या घडामोडी आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेली उभी फूट यामुळे शिवसेनेचे राज्यात दोन गट झाले असले तरी नगर शहरात अपवाद वगळता शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं.मात्र यात ऊ बा ठा शिवसेनेने कधीकाळी नगरकरांच्या मनावर राज्य केलं होतं त्याचं शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आणि नगरसेवक सध्या शांततेची भूमिका घेऊन बसले आहेत याचं कोड नगरकरांना उलगडले नाही. नगर शहरातील अनेक समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी नागरिक शिवसेनेकडे अशाने पाहत आहेत.मात्र शिवसेनेचे वाघ डरकाळी फोडायला तयार नाहीत. मात्र युवा सेनेचे राज्यसचिव विक्रम अनिल भैय्या राठोड आणि शिवसेनेचे महानगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे,योगीराज गाडे यांच्या माध्यमातून शिवसेनेचा आवाज थोडाफार तरी ऐकायला मिळत आहे. मात्र इतर वाघ शांतच असल्याचे दिसून येत आहे.

नगर शहरात शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की त्या पक्षावर नगरकरांनी भरभरून प्रेम केल आहे. शिवसेनेकडून नगरकरांना फार अपेक्षा आहेत मात्र मध्यंतरीच्या काळानंतर शिवसेनेचा आवाज खूप क्षीण झाला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आवाजच नगर शहरात घुमलाच नाही सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर नगर शहरातील अनेक नगरसेवक त्यांच्या बरोबर जातील असे वाटत असताना बोटावर मोजण्या इतके नगरसेवक त्यांच्याबरोबर गेले मात्र त्यांचे अस्तित्वही आता दिसून येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आवाज नगर शहरात घुमलाच नाही असं म्हणणे वागवे ठरणार नाही.

महानगरपालिकेची निवडणूक आता पुढे ढकलली असल्यामुळे सध्या सर्व स्तरावर शांतता आहे. लोकसभेची निवडणुकीची तयारी सुरू झाली असली तरी राज्यात झालेल्या राजकारणातील आणि पक्ष फुटीच्या गोंधळानंतर आता कोण कोणाच्या पाठीशी उभा राहणार हा मोठा प्रश्न सर्व ठिकाणी उपस्थित होणार आहे. त्याप्रमाणे नगर शहरातही सध्या सर्व अलबेल दिसून येत आहे.सर्वच पक्षाचे अपवाद सोडता नेते खासदार सुजय विखे पाटील यांच्या मागे उभे असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील राजकारण नेमकी कोणती दिशा घेणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या नगर शहरात खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचा धर्म म्हणून जोडगोळीने कामास सुरुवात केली आहे. मात्र भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना तसेच शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे कारण आज पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप, शिवसेना असे चित्र नगरमध्ये पाहायला मिळत होते मात्र राज्यातील समीकरणाने सर्वच बदलले असून अनेकांची आता स्वतःच्याच पक्षात घुसमट होत असल्याचे चित्र पाहायला मिळतेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular