Home राजकारण नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे यांचा ऊ बा ठा शिवसेनेला...

नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे यांचा ऊ बा ठा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ … उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

अहिल्यानगर दिनांक 3 डिसेंबर

अहिल्या नगर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे, यांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

येणाऱ्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडण्याची चिन्ह दिसत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासूनच अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते मात्र भाजपमध्ये जायचं का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायचे याबाबत अनेकांचे दुमत असल्याने हा प्रवेश अनेक दिवस लांबला होता मात्र आता अखेर आज नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असून नगर शहराचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन जाधव यांच्यासह आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अजून काही नगरसेवक प्रवेश करणारा असून मात्र हा प्रवेश सोहळा मोठा भव्य दिव्य होणार असल्यामुळे आज मुंबई येथे यावर चर्चा झाली आहे त्यामुळे काही काळातच एकनाथ शिंदे हे नगर शहरात येणार असून नगर शहरात भव्य दिव्य सोहळा होऊन त्यावेळी अनेक नगरसेवक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version